29.5 C
Panjim
Monday, March 27, 2023

मान्सूनसाठी कोकणरेल्वे सज्ज

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू आणि श्रमिकांच्या घरवापसीसाठी अहोरात्र मेहनत घेतलेल्या कोकण रेल्वेने याच कालावधीत आपली मान्सूनपूर्व सुरक्षा उपाययोजनांची कामे हि पूर्ण केली आहेत. १० जूनपासून कोकणरेल्वेच्या मार्गावर मान्सून वेळापत्रक लागू होत असून सुरक्षेचे उपाय म्हणून संपूर्ण मार्गावर ९७४ कर्मचारी २४ तास पेट्रोलिंगसाठी तैनात केले जात आहेत. पावसाळ्याच्या काळात संपूर्ण वहातूक सुरक्षित व्हावी यासाठी सुरक्षा उपाययोजनांची सगळी कामे कोकण रेल्वेकडून पूर्ण करण्यात आली आहे.

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेकडून कोलाड ते ठोकूर या आपल्या ७४० किलोमीटर च्या पट्यात मान्सून पूर्व कामांना काही दिवसांपूर्वी सुरवात करण्यात आली होती. यात प्रामुख्याने पावसात कोकणरेल्वेच्या मार्गावर पाणी येऊ नये यासाठी पाण्याचे मार्ग मोकळे करणे आणि मार्गानजीकच्या कटिंगची पहाणी करून धोकादायक वाटणारी कटिंग काढून टाकणे याला प्राधान्य देण्यात आले. गेल्या काही वर्षात केलेल्या सततच्या उपाययोजनानी आणि घेतलेल्या खबरदारीमुळे गेल्या सात वर्षात मार्गावर दरड व माती येण्याचे प्रकार खूप कमी झाले आहेत.

मान्सूनच्या काळात आता संपूर्ण कोकण रेल्वेच्या मार्गावर ९७४ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून २४ तास गस्त घातली जाणार आहे. जी धोकादायक कटिंग आहेत इथे विशेष उपाययोजना केल्या गेल्या असून या ठिकाणी २४ तास कर्मचारी तैनात ठेवण्यात येणार आहे. अशा ठिकाणांवर रेल्वेचा वेग हि नियंत्रित ठेवण्यात येणार आहे. आपत्कालीन स्थितीत तात्काळ मदत मिळावी यासाठी ठराविक अंतरांवर पोकलेन मशिन्स सारखी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहेत.

मुसळधार पाऊस पडत असताना रेल्वेचा वेग ताशी ४० किमी असावा अशा सूचना लोकोपायलटला देण्यात आल्या आहेत तर आपत्कालीन स्थितीत मदतीकरिता असिडेन्ट रिलीफ मेडिकल व्हॅन रत्नागिरी आणि वेरना गोवा इथे तैनात ठेवण्यात आल्या आहेत. लोकोपायलट आणि गार्डना वॉकी-टॉकी यंत्रणा पुरवण्यात आल्या आहेत. तर मार्गावर पूर्वी पासून एक एक किलोमीटर अंतराकार्यरत असलेली संपर्क यंत्रणा मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा तपासून सज्ज करण्यात आली आहे. सॅटेलाईट फोन सारखी अत्याधुनिक यंत्रणाही रिलीफ व्हॅनमध्ये सुसज्ज ठेवण्यात आली आहे.

मान्सूनच्या काळात बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव या तीन ठिकाणी नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहून रेल्वेच्या सुरक्षित वाहतुकीवर लक्ष ठेवून राहील. कोकण रेल्वेच्या मार्गावर मान्सून वेळापत्रक १० जून २०२० ते ३१ ऑक्टोबर २०२० या कालावधीसाठी कार्यान्वित राहील अशी माहिती कोकण रेल्वे कडून देण्यात आहे. पावसाळयातील प्रवाश्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी कोकणरेल्वेने सर्व त्या सुरक्षा उपाया सह सज्ज झाली आहे.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles