महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीत सत्ता स्थापनेवरून चांगलीच ठिणगी पडली आहे. ५०-५० च्या फॉर्म्युल्यावर मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवल्याने भाजपसोबतची आज होणारी बैठक उद्धव ठाकरे यांनी रद्द केली आहे. शिवसेनेला ५०-५०च्या फॉर्म्युल्यानुसार अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देणार असे आश्वासन भारतीय जनतापक्षाने कधीन दिलेले नव्हते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगताच शिवसेनेने त्याचा समाचार घेतला आहे. फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर कधीही चर्चा झाली नाही, असे जर मुख्यमंत्री बोलत असतील तर आपल्याला सत्याची व्याख्याच बदलावी लागेल, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. एकंदर महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरून युतीत चांगलाच संघर्ष निर्माण झाला आहे. दरम्यान मुख्यमंत्रीपदावरुन सुरु असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपाने आज आयोजित केलेली बैठक उद्धव ठाकरे यांनी रद्द केल्याचे वृत्त आहे. फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर चर्चाच झाली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटल्यानंतर शिवसेनेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Home National News महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवल्याने भाजपसोबतची बैठक उद्धव ठाकरेंनी केली रद्द