28.1 C
Panjim
Saturday, July 2, 2022

बिबट्याच्या कातड्याच्या तस्करी प्रकरणी पाच जण ताब्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई देवगड येथून सावंतवाडी शहरात बिबट्याची कातडी नेट होते

spot_img
spot_img
spot_img
spot_img

सिंधुदुर्ग – बिबट्याच्या कातड्याच्या तस्करी प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली आहे. या कारवाईत साडेतीन लाखांच्या कातड्यासह ४ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

देवगड येथून सावंतवाडी शहरात बिबट्याची कातडी नेट होते

देवगड येथून सावंतवाडी शहरात बिबट्याची कातडी विक्री करण्याच्या उद्देशाने आणत असताना पाच जणांना सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी मळगाव घाटीत ही कारवाई केली. या तस्करीप्रकरणी पाच जणांना वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्याकडून साडेतीन लाखांच्या बिबट्याच्या कातडीसह क्वालीस गाडी मिळून साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

देवगड येथून सावंतवाडीच्या दिशेने बिबट्याच्या कातड्याची तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. झाराप पत्रादेवी बायपास वरून जळगाव घाट मार्गे सावंतवाडीत येत असताना स्थानिक गुन्हे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी क्वालीस गाडीतील तस्करांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून बिबट्याचे सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचे कातडे हस्तगत केले.

गाडी आणि आरोपी घेतले ताब्यात

या प्रकरणात वापरण्यात आलेली क्वालिस गाडी ही ताब्यात घेण्यात आली. या तस्करीप्रकरणी समीर सूर्यकांत गुरव (पेंढरी देवगड ), नितीन प्रकाश सूर्यवंशी, ( माजगाव तांबळ गोठण )व्यंकटेश दत्‍ताराम राऊळ (सावंतवाडी ) किरण राजाराम सावंत ( चराठा ) दिनेश काशिराम गुरव ( पेंढरी देवगड )या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचा ताबा वन विभागाकडे देण्यात आला आहे शुक्रवारी त्यांना येथील न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player
- Advertisement -spot_img
spot_img
spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

More Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img