सिंधुदुर्ग – बाळासाहेब ठाकरे यांची जीवाची पर्वा न करता संरक्षण करण्याचे काम आयुष्यभर केलेल्या नारायण राणे यांचे राहते घर तोडण्यासाठी त्यांचाच मुख्यमंत्री मुलगा उद्धव ठाकरे हे प्रयत्न करत आहेत. त्यांची ही गोष्ट जुन्या कडवट शिवसैनिकांना आवडलेली नाही. आदीश बंगल्याजवळ मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी पोहोचले आहेत. त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे हे बंगल्यात उपस्थित आहेत. तर मालवण च्या नीलरत्न बंगल्या बाबत अद्यापही आपल्याला कोणतीही नोटीस मिळालेली नाही. असे आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग मध्ये बोलताना सांगितले आहे.
आमदार नितेश राणे यांनी आज ओरोस पोलिस ठाण्यात हजेरी लावली. यानंतर ते माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. नितेश राणे म्हणाले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची नारायण राणे यांनी जीवाच्या पलीकडे आयुष्यभर सेवा केली. मात्र त्याबाबत कोणतीही जाणीव न ठेवता बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राणे यांचे घर तोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र हे आदेश केंद्र सरकारचे आहेत की केंद्राचे नाव सांगून राज्य सरकारच काही गडबड करते आहे हे लक्षात घ्यावे लागेल. असेही आमदार नितेश राणे यावेळी म्हणाले.
आदिश बंगल्याच्या बाहेर मुंबई महानगरपालिकेत पथक पोचलेला आहे. मात्र नीलरत्न बंगल्याबाबत अद्यापही आपल्याला कोणतीही नोटीस मिळालेली नाही. आदिश बंगल्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे हे उपस्थित आहेत. ते या पथकाला योग्य ती माहिती देतील असे ते यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही कृती जुन्या कडवट शिवसैनिकांना आवडलेली नाही. त्यांचे आम्हाला फोन येत आहेत आणि आपली नाराजी ते व्यक्त करत आहेत. असेही आमदार नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटायला वेळ आहे, मात्र महाराष्ट्रातील जनतेला भेटायला वेळ नाही. जनतेचे प्रश्न सोडवायला वेळ नाही. अशी टीका देखील त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भेटीवर केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर देखील त्यांनी निशाना साधला. आदित्य ठाकरे हे याठिकाणी फोटोसेशन करायला येत आहेत? की बंगला किती पडला हे पाहायला येत आहेत ? असेही त्यांनी यावेळी उलट प्रश्न विचारले. पर्यावरण आणि पर्यटन मंत्री म्हणून या जिल्ह्याच्या स्वतंत्र दौऱ्यावर ते अडीच वर्षानंतर आले आहेत. मागे जाताना किमान काहीतरी पॅकेजची घोषणा करून त्यांनी जावे असे देखील नितेश आणि यावेळी म्हणाले.