जिल्ह्यात ग्रामपंचायत आणि जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीच बाजी मारेल जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी व्यक्त केला विश्वास

0
56

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना पक्षाचा भगवा प्रत्येक ग्रामपंचायतीवर फडकेल. कणकवली तालुक्यातील गांधीनगर ग्रामपंचायतीने सुरवात झाली आहे. असे सांगतानाच आगामी जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनाच सत्ता राखेळ असा विश्वास जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी व्यक्त केला आहे.

गांधीनगर ग्रामपंचायत शिवसेनेकडे बिनविरोध

कणकवली तालुक्यातील गांधीनगर ग्रामपंचायत शिवसेनेकडे बिनविरोध आली आहे. या ग्रामपंचायतीमधील सातही सदस्य शिवसेनेचे बिनविरोध निवडून आले आहेत. गांधीनगर ग्रामवासियानी शिवसेनेवर टाकलेला विश्वास जिल्ह्यात परिवर्तन घडवणारा ठरणार आहे. असे यावेळी बोलताना शिवसेना नेते तथा जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत म्हणाले. ही ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून पहिल्यांदा बिनविरोध आली आहे. या ग्रामवशीयांचा विश्वास आम्ही नक्कीच वाया जाऊ देणार नाही असेही ते म्हणाले.

जिल्हा बँकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल

यावेळी त्यांनी जिल्हा बँकेवर शिवसेनेचा भगवाच फडकेल असे म्हटले आहे. जिल्हा बँकेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. यासाठी खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नातून भाजपा देखील सक्रिय झाली आहे. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांच्या नेतृत्वात जिल्हा बँकेचे सत्ता मिळविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. मात्र विरोधकांची डाळ शिजू देणार नाही असे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांनी म्हटले आहे. आम्ही शेतकऱ्यांना सुलभ कर्ज व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. दुसऱ्या बाजूला जिल्ह्यात बँकेच्या क्षेत्रात महाविकास आघाडीच वर्चस्व आहे. त्यामुळे या बँकेवर आमची सत्ता सहज येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here