21.7 C
Panjim
Sunday, March 26, 2023

जिल्ह्यात आणखी एका कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यू दिवसभरात आणखी दोघांना कोरोनाची बाधा – जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 04 – जिल्ह्यात आज आणखी एका कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे. देवगड तालुक्यातील शिरगांव येथील 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. सदर महिलेस मधुमेह व उच्चरक्तदाबाचा त्रास होता. पनवेल येथून आलेल्या या महिलेचा दिनांक 28 मे 2020 रोजी स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. त्याचा अहवाल दिनांक 2 जून 2020 रोजी प्राप्त झाला होता.
कोरोना तपासणीचे आज प्राप्त झालेल्या अहवालांनुसार आणखी 2 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे आणि चौकुळ या गावातील हे दोन रुग्ण आहेत. तर काल जिल्ह्यातील रुग्णसंख्येमध्ये 6 ची भर पडली आहे. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील 3, सावंतवाडी तालुक्यातील 1, वैभववाडी तालुक्यातील 1, देवगड तालुकयातील एका व्यक्तीचा समावेश आहे.
जिल्ह्यात सध्या कणकवली तालुक्यातील पुढील प्रमाणे कंटेन्मेंट झोन आहेत. मौजे तळेरे, मौजे नाटळ, मौजे कुरंगवणे, मौजे नवीन कुर्ली वसाहत, मौजे जानवली गावातील घरटणवाडी येथील प्राथमिक शाळा, मौजे शेर्पे येथील बौद्धवाडी, शिवडाव, डामरे, मौजे वारगाव येथील धुमकवाडी, मौजे हरकुळ बुद्रुक येथील कांबळेवाडी, आईनतळवाडी, व्हावटवाडी, मौजे बीडवाडी येथील बीडवाडी हायस्कुल व आवार, मौजे कासार्डे येथील धुमाळवाडी, मौजे हरकुळ खुर्द येथील गावठण, तांबळवाडी, वरचीवाडी, गायकवाडवाडी, मौजे बावशी येथील शेळीचीवाडी, मौजे पियाळी येथील गावठण. वैभववाडी तालुक्यात मौजे तिरवडे तर्फ सौंदळ गावातील घागरेवाडी, मौजे कोळपे व मेहबुबनगर, ब्राह्मणदेववाडी, आणि उंबर्डे हे कंटेन्मेंट झोन आहेत. सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे गावठणवाडी, मौजे माडखोल येथील बामणादेवीवाडी, मौजे निरवडे माळकरवाडी, मौजे बांदा गाव गवळीटेंबवाडी, मौजे असणिये येथील भट्टवाडी, धनगरवाडी, वायंणवाडी, चौकुळ अंतर्गत पाटीलवाडी, देऊळवाडी, जुवाटवाडी, खासकीलवाडी, तोरसवाडी, घोणसाटवाडी, मधलीवाडी, मौजे सातोसे-दुर्गवाडी या ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत. कुडाळ तालुक्यातील कंटेन्मेंट झोनची माहिती पुढील प्रमाणे आहे. पणदूर – मयेकरवाडी, आंब्रड गावची वरची परबवाडी, तांबेवाडी, टेंबवाडी, मौजे पडवे गावची पडवे पहिलीवाडी, मौजे गावराई गावची टेंबवाडी, मौजे रानबांबूळी गावची पालकरवाडी. मालवण तालुक्यातील हिवाळे, सुकळवाड येथील राऊळवाडी व ठाकरवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड हे कंटेन्मेंट झोन आहेत.

अ.क्र विषय संख्या
1 शासकीय संस्था अलगिकरणातील व्यक्ती 553
2 गावपातळीवरील अलगिकरणातील व्यक्ती 23159
3 नागरी क्षेत्रातील अलगिकरणातील व्यक्ती 1346
4 पाठविण्यात आलेले एकूण नमुने 2198
5 अहवाल प्राप्त झालेले नमुने 2129
6 आतापर्यंत पॉजिटीव्ह आलेले नमुने 97
7 निगेटीव्ह आलेले नमुने 2029
8 अहवाल प्राप्त न झालेले नमुने 69
9 सध्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण 78
10 डिसचार्ज देण्यात आलेले रुग्ण 16
11 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 2
12 विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 71
13 आज रोजी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती 5858
14 दि. 2 मे 2020 रोजी पासून जिल्ह्यात आलेल्यांची संख्या 71502
00000

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles