32 C
Panjim
Monday, May 16, 2022

खैराची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर वनविभागाची कारवाई

spot_img
spot_img
spot_img

Latest On Hub Encounter

Latest on Passay

सिंधुदुर्ग – लांजा येथून सावंतवाडी येथे चाललेला टाटा कंपनीचा ट्रक ( एम एच १०-झेड ०५६०) शेेडीव किटा खैर लाकूड अवैध रित्या घेऊन जाताना आज खारेपाटण चेकपोस्ट येथे सकाळी ६. ३० च्या सुमारास खारेपाटण चेक पोस्ट येथे वन क्षेत्र अधिकरी यांनी पकडला.

या प्रकरणी वाहन चालक विलास विठ्ठल डोंगरे (राहणार देवरुख) व मालक राजेश कोलपटे (राहणार लांजा) यांच्यावर अवैध वाहतूक केल्याप्रकरणी व पास मध्ये दाखवलेल्या मालापेक्षा अधिक सुमारे १५ ते १६ घन मीटर माल गाडीत आढळून आल्याप्रकरनी वनविभागाच्या वतीने गुन्हे दाखल केला जाणार आहे.

वन परिक्षेत्र कार्यालय कणकवली यांच्यावतीने ही कारवाई करण्यात आली. यात कणकवली वनक्षेत्रपाल अधिकारी श्री. घुनणकीकर, वनपरिमंडल अधिकारी अनिल जाधव, सारिक फकीर, सत्यवान सुतार, वनरक्षक संजीव जाधव, विश्वनाथ माळी, अनिल राख, अतुल खोत, अतुल सुतार, एम पी शेगावे, चंद्रिका लोहार, शिर्के आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

खारेपाटण चेक पोस्ट येथे आज करण्यात आलेल्या कारवाईत सदर खैर लाकूड वाहतूक करताना देण्यात आलेल्या पासामध्ये तफावत आढळून आली. पास मंजूर केलेला शिक्का मालावर आढळून आलेला नाही.

त्यामुळे सदर खैर लाकूड वाहतूक करणारा ट्रक वन विभागाने आपल्या ताब्यात घेतला असुन पुढील अधिक चौकशी साठी फोंडा विक्री आगार वनपरिमंडळ अधिकारी फोंडा कार्यलय येथे पाठविण्यात आला असल्याची माहिती राजेंद्र घुनकीकर वनक्षेत्रपाल अधिकारी कणकवली यांनी दिली.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img