कोरोना प्रतिबंधक नियमांच्या अंमलबजावणीसह परदेशातून गावात येणाऱ्यांची तपासणी करा जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या प्रांताधिकारी, तहसिलदार व गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

0
81

 

सिंधुदुर्ग – कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन प्रकार जगभरात वेगाने पसरत आहे. राज्यातही कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी. परदेशातून गावात येणाऱ्या नागरिकांची माहिती मिळवून सात दिवसांनंतर पुन्हा त्यांची आरटीपीसीआर तपासणी करावी.

त्याचबरोबर विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी अशी सूचना प्रांताधिकारी, तहसिलदार व गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज दिली.

राज्य शासनाच्या सूचनेनुसार ओमिक्रॉन प्रतिबंधासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना करुन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, फेब्रुवारीमधील संभाव्य रुग्ण वाढीचा अंदाज घेऊन आतापासूनच आपली सर्व तयारी आवश्यक आहे.

त्यादृष्टीने तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांनी एकत्रित बैठक घ्यावी. जत्रा, यात्रांच्या पार्श्वभूमीवर संबंधित देवस्थान समितीने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी बाबत निर्देश द्यावेत. येणाऱ्या भाविकांची थर्मल तपासणी आणि दुसरा डोस नसणाऱ्यांची आरटीपीसीआर तपासणी करावी.

त्याचबरोबर तपासण्याही वाढवाव्यात. आरोग्य विभागाने प्राणवायुचा साठा त्या अनुषंगाने लागणारी साधनसामुग्री, जनरेटर सुस्थितीत ठेवावेत. आवश्यकत्या मनुष्यबळांसाठी प्रस्ताव पाठवावेत. जिल्ह्यातील कोविड केंद्रांबाबतही पूर्वतयारी ठेवावी असेही त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here