एसटी बंद असल्यामुळे शिवडाव हायस्कूलने सुरू केल्या वाढीवर शाळा

0
46

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील शिवडाव हायस्कूलने आदर्शवत निर्णय घेत एसटी बंद असल्याने वाडीवार शाळा घेऊन शिक्षणसेवा सुरू ठेवली आहे.

वागदे व हळवल येथे ५वी ते १०वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू केल्याची माहिती प्रशाळेचे शिक्षक श्रीकृष्ण गावडे यांनी गुरुवारी वागदे येथे बोलताना दिली आहे.

कोरोनाची महामारी पसरली आणि शाळा बंद झाल्या त्या सुमारे दोन वर्षासाठी काही कालावधी ऑनलाइन शिक्षण देऊन मुलांचे शिक्षण कसेबसे पूर्ण झाले आणि कोरोनाचे नियम शिथिल करून शाळा पुन्हा एकदा सुरू करण्यात आल्या.

भविष्याच्या दृष्टीने शिक्षण फार महत्वाचे असल्याने पालक व विद्यार्थ्यांना आनंदही झाला. मात्र पालक व विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण पडले ते एस. टी. संपामुळे. राज्य शासनात विलिनीकरण व्हावे, या मागणीसाठी सध्या एस. टी. कर्मचारी संपावर आहेत.

बस बंद असल्यामुळे लांब पल्ल्याच्या शाळांमध्ये विद्यार्थांना जाणं जड झाले. अशातच विध्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शिवडाव हायस्कुल शिवडावच्या संस्थेने एक आदर्शवत निर्णय घेतला आहे. शिवडाव हायस्कुल मध्ये हळवल व वागदे येथील अनेक मुले शिक्षण घेत आहेत.

बस बंद असल्याने सुमारे १० ते १२ किलोमीटर चा प्रवास करणे किंवा खाजगी वाहन घेऊन जाणे आर्थिक परिस्थिती नुसार परवडणारे नसल्याने शिवडाव हायस्कुल शिवडावच्या संस्थेने वाडीवार शाळा घेण्याचा आदर्शवत निर्णय घेतला आहे.

५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे दररोज वागदे व हळवल येथे वर्ग घेतले जात असून पालक व ग्रामस्थ यांच्या काढून प्रशालेचे कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here