28.1 C
Panjim
Saturday, July 2, 2022

आमदार वैभव नाईकांकडून कणकवली भडकविण्याचा प्रयत्न कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा आरोप

spot_img
spot_img
spot_img
spot_img

 

सिंधुदुर्ग – महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंद वेळी कणकवली पटवर्धन चौकात शिवसैनिकांनी सुरू असलेल्या बेकरीच्या शटरवर लाथा मारल्या. शिवसेनेच्या या जबरदस्तीचा निषेध करत आहोत.

आमदार वैभव नाईक कणकवली भडकविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी कुडाळात जाऊन दुकाने बंद करावीत. व्यापाऱ्यांना नाहक त्रास दिल्यास आम्ही व्यापाऱ्यांसोबत आहोत.

त्या बेकरी मालकाने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास आम्ही व्यापाऱ्यांच्या पाठीशी राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

लखीमपूर मधील घटनेचा आम्हीही निषेध करतो. ज्या व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली त्यांना गुलाबपुष्प देत नगराध्यक्ष नलावडे यांनी स्वागत केले. कणकवली शहरात महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदचा पुरता फज्जा उडाला.

बेकरीचे शटर माजी नगरसेवक असलेल्या शिवसैनिक भूषण परुळेकर व अन्य शिवसैनिकांनी जबरदस्तीने बंद केले. या धाकदपटशाही चा आम्ही निषेध करतो. एकेकाळी बाळासाहेबांनी एक आवाज दिला की सगळा महाराष्ट्र ठप्प होत असे.

पण आता शिवसेनेच्या हाकेवर एक दुकान बंद होत नाही, याचे आत्मपरीक्षण सेनेने करावे, असा टोलाही नगराध्यक्ष नलावडे यांनी लगावला.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player
- Advertisement -spot_img
spot_img
spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

More Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img