आमदार नितेश राणे कणकवली पोलीस ठाण्यात तब्बल दीड तास करण्यात आली चौकशी

0
142

 

सिंधुदुर्ग – संतोष परब हल्यातील आरोपी असलेले आमदार नितेश राणे आज कणकवली पोलीस ठाण्यात हजर झाले. संतोष परब हल्ल्याच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतलेले आमदार नितेश राणे आज सकाळी साडे दहा वाजता कणकवली पोलीस ठाण्यात हजर झाले.

सोबत त्यांचे वकील संग्राम देसाई उपस्थित होते. तब्बल दीड तास आमदार नितेश राणेंची तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी संतोष परब हल्ल्याप्रकरणी चौकशी केली. आमदार नितेश राणे हे संतोष परब हल्ल्याच्या गुन्ह्यात तपासकामी पोलीस ठाण्यात आले होते एवढे सांगत अधिक तपशील सांगण्यास पोलिस निरीक्षक हुंदळेकर यांनी नकार दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here