आंबोली येथे खोल दरीत चिरे वाहतूक करणारा डंपर कोसळला

0
142

 

सिंधुदुर्ग – आंबोली येथील घाटात चिरे वाहतूक करणारा ट्रक वीस ते पंचवीस फूट खोल दरीत कोसळला.हा अपघात काल सायंकाळच्या सुमारास कुंभेश्वर परिसरात घडला.मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.तर संबंधित ट्रक अद्यापही अपघातग्रस्त ठिकाणी पडून आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,अपघाताच्या ठिकाणावरून मिळालेल्या माहितीनुसार त्यातून चिर्‍यांची वाहतूक होत होती.दरम्यान तो कुंभेश्वर परिसरात आला असता सावरीच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने तो दरीत कोसळला.याच ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here