30 C
Panjim
Wednesday, January 19, 2022

आंबेनळी घाटात मिनीबसला अपघात 19 प्रवासी जखमी, 4 गंभीर

Latest Hub Encounter

रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात अपघाताची मालिका सुरूच आहे. कार्तिकी एकादशीला पंढरपूरला गेलेले वारकरी परतत असताना आड गावाच्या हद्दीत आंब्याच्या झाडाला मिनीबसची धडक बसली आणि हा अपघात घडला. या अपघातात खेड तालुक्यातील खवटी येथील 19 वारकरी प्रवासी जखमी झाले आहेत.

हे वारकरी मिनीबस क्रमांक (एमएच 04/ एफके 1643) पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेले होते. विठ्ठल राखुमाईचे दर्शन घेऊन सर्व प्रवासी खेडकडे निघाले होते. मिनीबस आंबेनळी घाटात आड गावाच्या हद्दीत आली असता चालकाच्या चुकीच्या दिशेने बस चालवितान बसवरील नियंत्रण सुटून आंब्याच्या झाडाला बस धडकली. अपघातात बसमधील 19 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात 4 प्रवाशी गंभीर जखमी आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी मुंबई येथे दाखल करण्यात आहले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन जखमींना पोलादपूर रुग्णालयात दाखल केले असून जखमींवर उपचार सुरू आहेत. चालकाच्या चुकीच्या दिशेने गाडी चालविण्याने हा अपघात झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -