खारेपाटण जैनवाडीतील ग्रामस्थांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू

0
108

सिंधुदुर्ग – खारेपाटण शुकनदी च्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्याने खारेपाटण सह शुकनदी किनारी असलेल्या गावांना पुराचा फटका बसला आहे .

खारेपाटण गावाला अक्षरशः पुराच्या पाण्याने वेढा घातला असून खारेपाटण जैन वाडी येथील सूमारे १० ते १५ घरे पुराच्या पाण्यात असल्याने महसूल,पोलीस यंत्रणेच्या सहकार्याने या लोकांना बाहेर काढण्यासाठी बोट मागवून आता खारेपाटण मध्ये रेस्क्यु ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

यावेळी खारेपाटण ग्रामपंचायत सरपंच-राऊत, नायब तहसीलदार -राठोड, मंडळ अधिकारी-यादव, तलाठी, ग्रामसेवक यांच्यासह रेस्क्यु ऑपरेशन करण्यासाठी आलेले आपत्तकालीन पथक यांच्यासह पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here