सिंधुदुर्ग वेंगुर्ल्यात तीन नगरसेवक कोरोना पॉझिटिव्ह

0
190

सिंधुदुर्ग – वेंगुर्ले शहरात आज घेण्यात आलेल्या कोरोना अहवालामधील नगरपरिषदेच्या ३ नगरसेवकांचे व २ कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान यांच्या संपर्कात आलेल्या इतरांचेही अहवाल घेण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी दिली आहे. यामुळे आता ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर वेंगुर्लेवासीयांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.

आज वेंगुर्ला शहरात एका भाजीपाला व्यावसायिकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला शहरातील भाजीपाला व्यवसायिक व नगरपालिका कर्मचारी व पदाधिकारी यांची कोव्हिड टेस्ट करण्यात आली होती. यावेळी आज दुपारी मिळालेल्या अहवालानुसार एक न प कर्मचारी व एक भाजीपाला महिला व्यावसायिक यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान महिला भाजीपाला व्यासायिक उभादांडा कांबळीवाडी येथील असून त्यांच्या घराभोवतालचा ५० मी चा परिसर कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे. आला आहे.

तसेच आज संध्याकाळी मिळालेल्या अहवालानुसार चक्क नगरपालिकाच्या तीन पदाधिकारी (नगरसेवक) व अजून एक न प कर्मचारी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पुढील अधिक माहिती नुसार कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती अशी माहिती तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here