सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुपोषणाचे संकट कायम

0
177

सिंधुदुर्ग – जिल्हा परिषद प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतरही सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुपोषणाचे संकट कायम आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ८९३ बालके कमी वजनाची, तर ५९ बालके तीव्र कमी वजनाची असल्याची माहिती जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ० ते ६ वयोगटातील ३५ हजार ७४१ बालके आहेत. या बालकांपैकी ३५ हजार ७१७ बालकांचे जूनअखेर वजन घेतले असता जिल्ह्यातील आठही तालुक्यातील मिळून कमी वजनाच्या बालकांची संख्या ८९३ आहे.
यापैकी १२० बालकांमध्ये सुधारणा होत आहे. तर तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्या ५९ एवढी आहे. यापैकी ६ बालकांमध्ये सुधारणा झाली असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली.
दरम्यान जिल्ह्यात कमी वजनाची बालके जन्माला येण्यामागे अनेक कारणे आहेत. कमी वयात मुलींची लग्ने, मुलांमध्ये जन्माचे योग्य अंतर न ठेवणे आणि गरिबी ही प्रमुख कारणे आहेत. यावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here