सिंधुदुर्गात जोरदार पाऊस, मच्छिमारांना समुद्रात जायला बंदी अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा

0
112

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात आज पावसाने मेघ गर्जनेसह जोरदार हजेरी लावली. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने कळविले आहे. त्यामुळे समुद्र खबळलेला राहणार असून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये तसेच समुद्रात गेलेल्या मच्छिमारांनी परत यावे असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे.

या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिनांक 4 जून 2020 रोजीपर्यंत गडगडाटासह मुसळधार पाऊस पडणार आहे. तसेच जिल्ह्यात सोसाट्याचे वारे वाहणार आहेत. समुद्र खवळलेला राहणार आहे. असे हवामान विभागाने म्हटले आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सावधानता बाळगावी. विशेषत: किनारी भागातील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी सतर्क रहावे. तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी शोध व बचाव साहित्य सुस्थितीत असल्याची खात्री करावी. शोध व बचाव गट कार्यरत ठेवावेत. जिल्हा नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहून कोणतीही दुर्घटना घडल्यास नियंत्रण कक्षाला तात्काळ माहिती द्यावी, विभाग प्रमुखांनी पुढील सूचना मिळेपर्यंत मुख्यालय सोडू नये, अशा सूचनाही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here