प्रतिभा डेअरीकडून सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांचे २ कोटी ६६ लाख रुप्याचे येणे – परशुराम उपरकर

0
124

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दूध बिलाची दोन कोटी 66 लाख एवढी रक्कम कोल्हापूरच्या प्रतिभा डेअरीकडे येणे बाकी आहे.ही रक्कम वसूल कोण करणार? या रकमेच्या वसुलीची जबाबदारी इथले लोकप्रतिनिधी अथवा राज्य शासन घेणार का असा सवाल मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ , कुडाळ यांचेमार्फत जिल्ह्यातील दुग्ध शेतकऱ्यांनी सहकारी संस्थे मार्फत दूध संकलन करून कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिभा दूध डेअरीला दूध पुरवठा केला होता. त्याची सुमारे 2 कोटी 66 लाख रुपयांची देणी प्रतिभा डेअरीकडून येणे बाकी आहे. याला तिथले सत्ताधारी आणि लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. असा आरोप यावेळी उपरकर यांनी केला आहे. सिंधुदुर्गात दुधाचा महापूर आणणार अशी घोषणा काँग्रेस राजवटीत तत्कालीन पालकमंत्री आणि त्यांच्या शिलेदारांनी केली होती. त्या अनुषंगाने कणकवलीत सुरू असलेली शासकीय डेरी दबावतंत्र वापरून बंद पाडण्यात आली आणि कोल्हापूरचा गोकुळ दूध उत्पादक संघ येथे दूध संकलनासाठी आणण्यात आला. मात्र गोकुळ दूध संघाकडून नही इथल्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली दुधाला कमी दर मिळू लागला. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या लोकप्रतिनिधी आणि सत्ताधाऱ्यांनी प्रतिभा डेअरी सिंधुदुर्गात आणली. या दूध डेअरी कडे सिंधुदुर्गातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे 2 कोटी 66 लाख रुपये येणे बाकी आहे. सिंधुदुर्गातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाच्या दराची हमी कणकवलीचे आमदार यांनी घेतली होती. आता कोरोना च्या काळात दूध संकलन थांबले असल्याने सिंधुदुर्गातील शेतकरी अडचणीत आला आहे. तर प्रतिभा डेअरीकडे 2 कोटी 66 लाख रुपयांची रक्कम थकीत राहिल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची ही थकीत रक्कम देण्याचा दानशूरपणा कणकवलीच्या आमदाराने दाखवावा असेही आव्हान परशुराम उपरकर यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here