नाणार रिफायनरी प्रकल्प व्हावा, भाजपच्या ठरावाला शिवसेनेचा होकार, देवगड पंचायत समितीत एकमुखी ठराव

0
135

 

सिंधुदुर्ग – देवगड पंचायत समिती सभेत नाणार रिफायनरी प्रकल्प व्हावा असा एकमुखी महत्वपुर्ण ठराव घेण्यात आला. विशेष म्हणजे या ठरावाला विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या सदस्यांनीही पाठींबा दिला. देवगड पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा येथील छत्रपती संभाजी महाराज सभागृहात सभापती सुनिल पारकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहाय्यक गटविकास अधिकारी अरूण चव्हाण उपस्थित होते.

कोरोना संकटकाळात लाखोंच्या संख्येने मुंबईतुन लोक गावी आले असून यातील युवावर्गाला सध्या रोजगाराचा प्रश्न भेडसावत आहे. मुंबई व इतर शहरातून गावी आलेल्या युवकांच्या रोजगारासाठी हा प्रकल्प व्हावा असा ठराव भाजपा सदस्य अजित कांबळे यांनी मांडला. या ठरावाला सदस्य सदाशिव ओगले यांनी अनुमोदन दिले व सर्व सदस्यांनी एकमुखी पाठींबा दिला यामध्ये शिवसेनेचे सदस्य तथा माजी उपसभापती संजय देवरूखकर यांनीही विरोध न दर्शविता पाठींबा दिला. नानार प्रकल्पाला शिवसेनेचा मोठा विरोध आहे अशावेळी शिवसेना सदस्याने दिलेला पाठिंबा चर्चेचा विषय ठरला आहे.

तळवडे न्हावनकोंड धबधब्याचा ठिकाणी नव्याने बांधण्यात आलेल्या वाहनतळ व चेंजग रूमचे काम निकृष्ट दर्जाचे आहे.चुकीच्या पध्दतीने काम झाले आहे.वाहनतळाचे कामही अन्य ठिकाणी व्हावे अशी मागणी कांबळे यांनी केली.बापर्डे-जुवेश्वरवाडी विभाजनाचा ठराव सदाशिव ओगले यांनी मांडला.रामेश्वर अनपूर येथे १५ दिवस पाणी नाही याकडे सदस्या शुभा कदम यांनी लक्ष वेधले. तांबळडेग येथील उधाणामुळे कोसळलेला मासळी सुकविण्याचा ओटा दुरूस्तीचे काम संबंधित ठेकेदाराकडून करून घ्यावे अशा सुचना सभापती सुनिल पारकर यांनी पतन विभागाला दिल्या. गणेशोत्सव काळात प्रत्येक गावात दिवसभरात एक एस्टीफेरी सुरू करावी अशी मागणी सदस्या जयश्री आडीवरेकर यांनी केली. वाडा येथील डॉ.आंबेडकर चौकातील जुना पुल हटविण्यात यावा असे आदेश देण्यात आले आहेत.त्याची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ करावी अशी मागणी पुर्वा तावडे यांनी केली.

यावेळी बोलताना भाजपा सदस्य अजित कांबळे म्हणाले सध्या कोरोनामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. यावेळी मुंबईहून इथे आलेल्या तरुणांना आणि आता बेरोजगार झाल्यानं रोजगाराच्या संधी मिळाव्यात म्हणून हा प्रकल्पझाला पाहिजे या भूमिकेतून आपण हा ठराव मंडल असल्याचे कांबळे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here