एसटी वाहतूक नियंत्रकांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

0
108

सिंधुदुर्ग – मनसे उपजिल्हाप्रमुख दया मेस्त्री यांच्यासह चौघांनी कणकवली एसटी आगारात वाहतूक नियंत्रक म्हणून सेवा बजावत असलेल्या विनय वासुदेव राणे (५२, जानवली, सखलवाडी) यांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत विनय राणे यांनी कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी हे गुरुवारी कणकवली एसटी आगारातील वाहतूक नियंत्रण कक्षाजवळ गेले.

 

तसेच दया मेस्त्री यांनी विनय राणे यांना उद्देशून बाहेर एस टी कर्मचाऱ्यांचा संप अजून चालू आहे. आणि तुम्ही आत का बसलात ? जिल्ह्यात अजून गाड्या चालू झालेल्या नाहीत.

 

आम्ही एकही गाडी चालू होऊ देणार नाही. तुम्ही बाहेर या. नाहीतर मी आत येतो. असे म्हणत दया मेस्त्री व सोबत अन्य तीन कार्यकर्ते हे नियंत्रण कक्षात गेले.

 

विनय राणे यांना चला उठा म्हणत नियंत्रण कक्षातील विजेचा दिवा बंद केला. तसेच सरकारी काम करू दिले नाही अशी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

 

या तक्रारीनुसार दया मेस्त्री यांच्यासह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,अधिक तपास पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here