सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्ण संख्या 56 वर जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांची माहिती

0
245

 

सिंधुदुर्ग – जिल्हा सामान्य रुग्णालयाला आज प्राप्त झालेल्या 123 कोरोना तपासणी अहवालापैकी 3 अहवाल पॉजिटीव्ह तर 120 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. पॉजिटिव्ह आलेले तीन रुग्णांमध्ये देवगड तालुक्यातील 1, कणकवली तालुक्यातील 1, मालवण तालुक्यातील 1 यांचा समावेश आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 56 अशी झाली आहे. त्यापैकी 7 रुग्ण बरे झाले आहेत. एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण उपचारासाठी मुंबई येथे गेला आहे. सद्या जिल्ह्यात 47 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

काल दिनांक 30 मे 2020 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे प्राप्त झालेल्या 31 अहवालांपैकी 5 अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 26 अहवाल निगेटीव्ह आलेत. पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये मालवण तालुक्यातील 3 आणि कणकवली तालुक्यातील 2 व्यक्तींचा समावेश आहे.
जिल्ह्यात सध्या कणकवली तालुक्यातील शिवडाव, डामरे, वारगाव येथील धुमकवाडी, हरकुळ बुद्रुक येथील कांबळेवाडी, आईनतळवाडी, व्हावटवाडी, बीडवाडी येथील बीडवाडी हायस्कुल व आवार, कासार्डे येथील धुमाळवाडी, हरकुळ खुर्द येथील गावठण, तांबळवाडी, वरचीवाडी, गायकवाडवाडी, बावशी येथील शेळीचीवाडी, पियाळी येथील गावठण, वैभववाडी तालुक्यातील तिरवडे तर्फ सौंदळ गावातील घागरेवाडी, मौजे कोळपे व मेहबुबनगर, ब्राह्मणदेववाडी, आणि उंबर्डे, सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे, मौजे माडखोल येथील बामणादेवीवाडी, कुडाळ तालुक्यातील पणदूर – मयेकरवाडी, मालवण तालुक्यातील हिवाळे, सुकळवाड येथील राऊळवाडी व ठाकरवाडी असे कंटेन्मेंट झोन आहेत.
जिल्ह्यात एकूण 27 हजार 507 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून त्या पैकी 428 व्यक्ती या शासकीय संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. तर 25 हजार 895 व्यक्तींना गावपातळीवरील संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. नागरी क्षेत्रात 1 हजार 184 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. तर जिल्ह्यात प्रवेश केलेल्या इतर सर्व नागरिकांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 1 हजार 810 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 1 हजार 574 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 56 अहवाल पॉजिटीव्ह आले असून उर्वरीत 1 हजार 518 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 236 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 164 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 84 रुग्ण डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलमध्ये, 42 रुग्ण डेडिकेटेड कोवीड हेल्थ केअर सेंटरमध्ये, कोविड केअर सेंटरमध्ये 38 रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी 6 हजार 16 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.

परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि. 2 मे 2020 पासून आज अखेर एकूण 58 हजार 825 व्यक्ती दाखल झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here