सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात अनेक समस्या आहेत.त्यामूळे मृतांची संख्या ६९ वर पोहचली आहे.८० टक्के रिक्तपदे आहेत,त्यामुळे रुग्णांच्या सेवेवर परिणाम झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना कोविड महामारीत वाचविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय कोविड सेंटरमधील त्रुटी दूर करा,अशी मागणी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांच्याकडे भाजपा माजी आ.प्रमोद जठार यांनी केली आहे.
मुंबईत आरोग्य संचालक डॉ.सतीश पवार यांची माजी आ.प्रमोद जठार यांनी भेट घेतली.आरोग्य राज्यमंत्री बाहेर असल्याने फोनवर चर्चा केली व निवेदन दिले त्यात खालील मागण्या केल्या आहेत.
कोरोनाच्या संकटकाळामध्ये जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरला भेट दिली असता खालील प्रमाणे त्रुटी आढळल्या आहेत. जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर हे २० टक्के कर्मचाऱ्यांवर सुरु आहे . उर्वरित ८० टक्के डॉक्टर, कर्मचारी भरतीचे काय नियोजन केले आहे ?याबाबत सरकारने भूमिका जाहीर करावी.
रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाची प्रत सुधारणेत यावी.रुग्णांना जेवणासोबत एक लिटर साफ स्वच्छ पिण्याच्या पाण्याची (बाँटलची ) व्यवस्था करणेत यावी,कारण रुग्णांच्या पाण्याची गैरसोय आहे.
रुग्णांना ‘ क ‘ जीवनसत्व वाढविण्यासाठी जेवणसोबत संत्रे किवा मोसंबी देणे आवश्यक आहे. फळांची पूर्तता करणेत यावी ,रूग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाच्या जागेची पाहाणी केली असता अत्यंत गालिच्छ असल्याचे आढळले आहे.तेथील स्वच्छता व सुधारणा करणेची व्यवस्था करावी . ऑक्सीजन सिलिंडर पुरवठा अपुरा पडत असल्याने त्याचे नियोजन करण्यात यावे .रेमेडेसिविअर या औषधाचा साठा जास्तीत जास्त असणे आवश्यक आहे. त्याबाबत योग्य ती व्यवस्था करणेत यावी,अशी मागणी केली आहे.
तसेच रुग्णांना पिण्यासाठी गरम पाण्याची आवश्यकता असल्याने ६ वॉटर डिस्पेसरची आवश्यकता आहे. त्याची व्यवस्था करणेत यावी. रुग्णवाहिकेची दुरुस्तीची कामे करण्यात यावी. १०८ रुग्णवाहिका पायलटना ५० लाख रुपयाचे विमा कवच देण्यात यावे . १०८ रुग्णवाहिका पायलटाचा पगार वेळेवर देण्यात यावा,अशा प्रकारच्या जिल्हा रुग्णालयातील त्रुटी आहेत, त्या शासनाने त्वरीत सोडवाव्यात अशी मागणी मंत्र्यांकडे प्रमोद जठार यांनी केली.
वरील मागण्यांवर आरोग्य संचालक डॉ.सतीश पवार यांनी स्वतः सिंधुदुर्गात येऊन आढावा घेणार असल्याचे आश्वासन दिले.तसेच जिल्हा शल्यचिकित्सक याच्याशी चर्चा केली आहे.