27 C
Panjim
Thursday, August 11, 2022

सिंधुदुर्गात ग्रामपंचायतीसाठी भाजप विरुद्ध महाआघाडी लढाई रंगणार अंतिम चित्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 4 जानेवारीला संपल्यावर स्पष्ट होणार आहे

spot_img
spot_img

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात 15 जानेवारीला होउ घातलेल्या 70 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील 602 जागांसाठी तब्बल एक हजार 558 अर्ज दाखल झाले. भाजप विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये लढत होत आहे. महाविकास आघाडीत शिवसेनेचा दबदबा आहे. अनेक ठिकाणी चौरंगी, तिरंगी लढतींचे संकेत दाखल अर्जावरून मिळत आहेत. अंतिम चित्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 4 जानेवारीला संपल्यावर स्पष्ट होणार आहे.

70 ग्रामपंचायतींच्या होणार निवडणुका

मालवण तालुक्‍यातील कुणकवळे, गोळवण-कुमामे, आडवली-मालडी, खरारे-पेंडूर, मसदे-चुनवरे. देवगड तालुक्‍यातील धालवली, गढीताम्हाणे, इळये, कातवण, कोर्ले, कुणकेश्वर, लिंगडाळ, मिठबाव, मोंड, मोंडपार, मुणगे-अक्षता देसाई, मुटाट, नाडण, पाळेकरवाडी, पाटथर, पुरळ, रहाटेश्वर, शिरगाव, तळवडे, तांबळडेग, टेंबवली, वाडा, वरेरी, कणकवली तालुक्‍यातील भिरवंडे, गांधीनगर, तोडवली- बावशी, सावंतवाडी तालुक्‍यातील आरोंदा, आरोस, आंबोली, इन्सुली, डिंगणे, तळवडे, चौकुळ, मळगाव, मळेवाड, कोलगाव, दांडेली. वैभववाडी तालुक्‍यातील सोनाळी, लोरे नं 2, मांगवली, कोकिसरे, खांबाळे, एडगाव, वेंगसर, सांगूळवाडी, आचिर्ने, नाधवडे, भुईबावडा, कुभंवडे, ऐनारी आणि दोडामार्ग तालुक्‍यातील तेरवण-मेढे, आयनोडे-हेवाळे, कुडासे या ग्रामपंचायतीचा समावेश होता. कुडाळ तालुक्‍यातील वसोली, गिरगाव-कुसगाव, माड्याचीवाडी, वाडोस, कुपवडे, गोठोस, आकेरी, पोखरण-कुसबे, गोवेरी वेंगुर्ले तालुक्‍यांतील आरवली आणि सागरतीर्थ या दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यानिमित्त जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. कार्यकर्त्यांची पळवापळवी सुरू झाली आहे.

देवगडमध्ये सर्वाधिक 405 अर्ज

सर्वाधिक 23 ग्रामपंचायती देवगड तालुक्‍यात आहेत. तालुक्‍यात सर्वाधिक 405 अर्ज दाखल झाले. सावंतवाडी तालुक्‍यात 11 ग्रामपंचायतींसाठी 378, वैभववाडी तालुक्‍यात 13 ग्रामपंचायतींसाठी 236, मालवण 6 ग्रामपंचायतींसाठी 192, कुडाळ 9 ग्रामपंचायतींसाठी 216, कणकवली 3 ग्रामपंचायतींसाठी 50, वेंगुर्ले दोन ग्रामपंचायतींसाठी 55, दोडामार्ग तीनसाठी 26 अर्ज अर्ज दाखल आहेत.

triumph-high school-ad
- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player
YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img