28.4 C
Panjim
Friday, May 27, 2022

साहसी जलक्रीडा प्रकारांचे परवाने देण्यासंदर्भात मुंबईत बैठक संपन्न ना. उदय सामंत, आ. वैभव नाईक, मेरिटाईम बोर्डाचे अमित सैनी यांनी घेतले सकारात्मक निर्णय मालवण जेटी येथे छ. शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारला जाणार

spot_img
spot_img
spot_img

Latest On Hub Encounter

Latest on Passay

सिंधुदुर्ग – साहसी जलक्रीडा प्रकारांचे परवाने देण्यासंदर्भांत मुंबई येथे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या दालनामध्ये कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड चे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी , एमिशनरी ऑफिसर श्री. बडये यांची काल मंगळवारी बैठक पार पडली. याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून उभारण्यात आलेल्या मालवण येथील नवीन जेटीचे उदघाटन ३१ नोव्हेंबर पर्यंत करून पर्यटकांसाठी जेटी खुली करण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार मालवण जेटी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या सूचना मेरिटाईम बोर्ड ला देण्यात आल्या.

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड च्या अखत्यारीत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक प्रश्नांवर आमदार वैभव नाईक यांनी चर्चा करून मालवण किनारपट्टीवरील साहसी जलक्रीडा प्रकार व्यवसायिक यांना सहज व सुलभ पद्धतीने या जलक्रीडा प्रकारांचा परवाना मिळावा अशी मागणी केली असता त्यावर अमित सैनी यांनी याबाबत या व्यावसायिकांना माहिती व्हावी व प्रत्यक्ष परवाने तयार करण्याकरिता मालवण येथे शिबीर आयोजित करून याद्वारे सर्व प्रक्रिया प्रत्यक्ष त्याचठिकाणी पार पाडण्यात येईल असे स्पष्ट केले.
समुद्री मार्गे प्रवासी बोट वाहतूक करणाऱ्या किनारपट्टी व्यवसायिकांना देखील अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या बोटींचा परवाना, वाहतुकीची परवानगी, विम्याची रक्कम अनेक प्रश्न निर्माण झाल्यामुळे या व्यावसायिकांना या प्रवासी बोट वाहतूकीची परवानगी मिळत नाही, यावर उपाययोजना करण्याची सूचना देण्यात आली.त्यावर अमित सैनी यांनी संबंधित अधिकाऱ्यांमार्फत याठिकाणी प्रत्यक्ष सर्वे करून या व्यावसायिकांचे प्रश्न समजावून घेऊन त्यावर तोडगा काढू असे स्पष्ट केले.
तसेच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार आमदार वैभव नाईक यांनी मालवण नवीन जेटी च्या बाजूला महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड च्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणीची सूचना केली. याबाबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून लवकरात लवकर याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करेल असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल असे अमित सैनी यांनी स्पष्ट केले.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img