28.4 C
Panjim
Tuesday, May 17, 2022

सावंतवाडीत सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

spot_img
spot_img
spot_img

Latest On Hub Encounter

Latest on Passay

सिंधुदुर्ग – सावंतवाडी शहरात आज सायंकाळच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान भर दुपारी हवामानात कमालीचे बदल झाले होते. त्यामुळे उष्णतेचा पारा सुद्धा मोठ्या प्रमाणात पडला होता. अखेर पावसाने आपली हजेरी लावलीच. मात्र अचानक पाऊस आल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली.

गेले काही दिवस या ठिकाणी रात्री कडाक्‍याची थंडी पडत आहे. असे असतानाच हवामानातील बदलामुळे आज दुपारी मोठ्या प्रमाणात उष्मा वाढला होता. तर सायंकाळच्या सुमारास अवकाशात ढग दाटून आले आहेत. अखेर याठिकाणी अवकाळी पावसाच्या सरींची बरसात झाली. दरम्यान या पावसाचा परिणाम आंबा-काजू पिकांवर होणार असून बागायतदार शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडले आहेत.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img