26.8 C
Panjim
Wednesday, June 29, 2022

सामना कोण वाचतो ? आमदार गोपीचंद पडळकर यांचा सवाल सिंधुदुर्गात सामनावर केली टीका

spot_img
spot_img
spot_img
spot_img

सिंधुदुर्ग – कोकण दौऱ्यावर असलेले धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकावर शब्दांचे आसूड ओढले आहेत.सामना पेपर कोणी वाचत नसल्याचे सांगून शिवसेनेच्या बालेकिल्ला असलेल्या कोकणात सामनाच्या किती प्रती येतात असा सवाल उपस्थित केला.आपल्या जिल्ह्यात सामना पेपर येत नसल्याचे सांगून त्यांनी आपण सामना कधीच वाचत नसल्याचे सांगितले.

कोकणात सामना किती येतो?

आधी पेट्रोलचे भाव कमी करा मग राम मंदिरासाठी निधी जमा करा या सामनात आलेल्या अग्रलेखावर गोपीचंद पडळकर यांनी खरमरीत टीका केली आहे. सामना पेपर कोणी वाचत नाही. तुम्ही लोकं टीव्हीवर सामना दाखवता मग तो लोकांना कळतो. कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे ,कोकणात सामना किती येतो? असा पडळकरांनी सवाल केला आहे.

मी तर सामना कधीच वाचला नाही

यावेळी बोलताना पडळकर म्हणाले उगाच बाऊ करू नका. आमच्या जिल्ह्यात सामना येतच नाही, मी तर सामना कधीच वाचला नाही. त्यामुळं असल्या विषयात बोलणं बरोबर नाही. असेही ते म्हणाले.

सरकारला जनताच रस्त्यावर फिरू देणार नाही

कोरोना आणि अधिवेशन याबाबत बोलताना ते म्हणाले. या सरकारला कुठल्याच विषयाचं गांभिर्य नाही.कोरोनाच्या काळात सर्वात जास्त भ्रष्टाचार झाला. कोरोना झाला म्हणून जर तुम्ही अधिवेशन टाळणार असाल तर महाराष्ट्राची जनता सगळं उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. या महाविकास आघाडी सरकारला जनताच रस्त्यावर फिरू देणार नाही.

ऊर्जा मंत्र्यांनी लोकांना फसवलं

विधानसभेत ऊर्जा मंत्र्यांनी जाहीर केल होत की लॉकडाऊन काळात 100 युनिटपर्यंत ज्यांचं बिल आलेलं आहे ते आम्ही माफ करू. नंतर 100 ते 300 युनिटपर्यंत बिल आलंय त्यांना आम्ही मदत करू असं ऊर्जामंत्री म्हणाले होते. नंतर मग त्यानी घुमजाव केला. उर्जामंत्र्यांनी ही फसवणूक केली असल्याचे ते म्हणाले.

धनगर समाज आरक्षणावर आमची भूमिका आजही ज्वलंत

गोपीचंद पडळकर यांनी यावेळी धनगर समाज आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी ते म्हणाले, धनगर समाज आरक्षणावर आमची भूमिका आजही ज्वलनत आहे. कोरोना काळात मोठ्या संख्येने एकत्र येऊन त्यांना काही कोरोनाची बाधा झाली तर त्यांच्याकडे उपचार करण्याइतकी परिस्थिती नाही. मात्र आमची भूमिका आजही ज्वलंत आहे असे ते म्हणाले.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player
- Advertisement -spot_img
spot_img
spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

More Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img