21.7 C
Panjim
Sunday, March 26, 2023

सत्ताधाऱ्यांकडून विज माफी च्या मुद्द्यावर जनतेची फसवणूक परशुराम उपरकर राज ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात आंदोलन छेडणार;उद्या जिल्हा मनसेची महत्वाची बैठक कणकवलीत…

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग – सध्याच्या राज्यकर्त्यांकडून जनतेची फसवणूक करत जनतेवर सातत्याने अन्याय करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिवाळीच्या पूर्वी गोड दिवाळी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती.अवकाळी पावसातील भात नुकसान शेतकरी भरपाईसाठी ५ कोटी देण्याचे पालकमंत्री यांनी घोषणा केली,अद्यापही पैसे नाही.मच्छिमार पॅकेजमध्ये साडेबारा कोटी आल्याचे सांगून दिशाभूल आमदाराने केली आहे.
पालकमंत्री,आमदार,खासदार फक्त घोषणा कारताहेत. घोषणेचे काय झाले? हे पाहत नाहीत.सत्ताधाऱ्यांकडून विज बिल माफी च्या मुद्द्यावर जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप परशुराम उपरकर यांनी केली.

कणकवली येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

वीज बिल माफीच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात आंदोलन छेडणात येणार आहे.त्यासाठी उद्या जिल्हा मनसेची महत्वाची बैठक कणकवलीत आयोजित करण्यात आली आहे.आमदार राज्याच्या प्रश्न आपणच सोडवला,असे दाखवतात.सांस्कृतिक कार्यक्रम श्रेय घेतात.मुळात राज्याचा तो निर्णय आहे.दशावतारी नाटक हा एकच विषय नाही तर सरकारने संपूर्ण राज्यातील कार्यक्रम सुरु केले आहेत.
वीज माफी बाबतीत सरकारने घोषणा केली.३०० युनिट पेक्षा जास्त वीज बिल माफी करणे अशी घोषणा होती. आता वीजबिले भरा, असे सांगत विजेचा शॉक वीज मंत्र्यांनी लोकांना लावला आहे.
मनसेची राज्याची बैठक मुबंईत आहे.जिल्हातही आंदोलन केले जाईल.नागरिकांनी अश्या आंदोलनात सहभागी झाले पाहिजे.शासनाच्या तिजोरीत खडखडाट असताना कर्ज काढून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी भाषा असते.मात्र मूलभूत गरजा, अडचणी बद्दल कोणतेही उपाय योजना न करता काम केले जात आहे.सत्ताधारीनी केलेल्या घोषणाबाजीच्या बातम्यांची फलक लावणार आहे.वीज प्रश्नी उद्या सकाळी १० वाजता बैठक लावण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आंदोलन केले जाईल,अशीही परशुराम उपरकर यांनी सांगितले.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles