27 C
Panjim
Thursday, August 11, 2022

मुद्रांक विक्री न करणाऱ्या परवानाधारकांना तातडीने नोटिसा बजावा…!! दुय्यम निबंधक श्रीमती एम.एम. कुरुंदकर यांना तहसिलदार रमेश पवार यांचे आदेश; आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा निबंधकांना तातडीने अहवाल देण्याच्या दिल्या सक्त सूचना…

spot_img
spot_img

सिंधुदुर्ग – कणकवली तहसील कार्यालयातील मुद्रांक विक्रेत्यांकडून मुद्रांक देण्यास टाळाटाळ केल्याची वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मंगळवारी सकाळी दुय्यम निबंधक कणकवली व मुद्रांक विक्रेते यांची संयुक्त बैठक तहसीलदार यांनी आयोजित केली. या बैठकीत मुद्रांक विकत नाही, त्या परवानाधारकांना तुमचा परवाना रद्द का करु नये असे नोटीसा बजावा,असे आदेश कणकवली तहसीलदारांनी दुय्यम निबंधक यांना दिले. तर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी कणकवली तहसील येथे भेट देऊन जिल्हा निबंधक पी.डी. पिसाळ यांच्याशी संपर्क साधत सदर मुद्रांक विक्रेत्यांवर काय कारवाई केली,याची माहिती तातडीने द्या,अशा सक्त सूचना केल्या आहेत.

कणकवली तहसीलदार रमेश पवार यांच्या दालनात दुय्यम निबंधक श्रीमती एम. एम. कुरुंदकर व कणकवली तील मुद्रांक विक्रेत्यांचे संयुक्त बैठक आयोजित केली या बैठकीला शिवसेना नेते संदेश पारकर संदेश पटेल मुद्रांक विक्रेते सुनील रेपाळ, कृष्णा परब, महेश पवार,भाग्यलक्ष्मी साटम, भालचंद्र साटम, संतोष जाधव आदी उपस्थित होते. तर काही मुद्रांक विक्रेते अनुपस्थित राहिले त्याबद्दल तहसीलदारांनी नाराजी व्यक्त केली.
सोमवारी मुद्रांक विक्रेत्यांना समोर एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी का झाली ?अशी विचारणा कणकवली तहसीलदार रमेश पवार यांनी मुद्रांक विक्रेत्यांना केली. त्यावर भालचंद्र साटम यांनी सोमवार असल्याने ही गर्दी झाल्याचे सांगितले.तसेच गेल्या वीस दिवसांत आपण किती मुद्रांक पेपर विकले? याची माहिती मुद्रांक विक्रेत्यांनी दिली.
दरम्यान,यावेळी पत्रकार भगवान लोके यांनी मुद्रांक विक्री बाबत सर्वसामान्य ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांच्या अडचणी येत आहेत. विनाकारण चुकीचे सांगू नका.त्याचबरोबर कोणकोणत्या मुद्रांक विक्रेत्यांनी गेल्या वीस दिवसात किती मुद्रांक कोषागार विभागातून खरेदी केले?याची माहिती दिली. त्यामुळे ५० टक्के मुद्रांक विक्रेत्यांनी एकही मुद्रांक खरेदी केला नसल्याचे या बैठकीत उघड झाले.
यावेळी कणकवली तहसीलदार रमेश पवार यांनी श्रीमती एम.एम.करुंदकार यांना ज्यांनी ज्यांनी मुद्रांक खरेदी केला नाही व नागरिकांना सेवा दिली नाही. या कारणातून त्यांना तातडीने नोटीसा बजावा त्या नोटिशीमध्ये तुमचा परवाना का रद्द करू नये? असा उल्लेख करावा तसा प्रस्ताव जिल्हा निबंधकांकडे कारवाईसाठी पाठवण्यात यावा,अशा सूचना दिल्या. तसेच या बैठकीनंतर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी कणकवली तहसील येथे भेट दिली. या भेटीत जिल्हा निबंधक पी.डी. पिसाळ यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला. कणकवली येथील मुद्रांक विक्रेताबाबत माध्यमांमध्ये जी झालेली चर्चा आहे. त्याबद्दल गंभीर दखल घ्यावी कणकवली येथे स्वतः भेट देऊन सदर मुद्रांक विक्रेत्यांनाबाबत चौकशी करावी. त्याचा अहवाल तातडीने मला देण्यात यावा,अशा सक्त सूचना जिल्हा निबंधकांना दूरध्वनीवरुन दिल्या आहेत.
तहसील कार्यालय येथे झालेल्या बैठकीत शिवसेना नेते संदेश पारकर यांनी जर कणकवली तहसील कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असेल तर त्याचे विकेंद्रीकरण तालुक्यातील मोठ्या बाजारपेठांमध्ये करण्यात यावेत.या ठिकाणी नव्याने मुद्रांक परवाना देण्यात यावेत. या संदर्भात प्रस्ताव करण्यात यावा. या मुद्रांक विक्रेत्यांना गरज नसेल तर नव्याने लोकांना काम करणाऱ्यांना संधी द्यावी. विनाकारण नागरिकांना वेठीस धरु नका. गरज आहे त्या नागरिकांना मुद्रांक मिळाले पाहिजेत, अशी मागणी या बैठकीत त्यांनी केली. त्यावर कणकवली तहसीलदार रमेश पवार यांनी मुद्रांक विक्रेता आणि सकाळी दहा ते सहा या वेळेत मुद्रांक विकले पाहिजेत. नागरिकांची गैरसोय होता कामा नये मुद्रांक विक्रेते आहेत. त्यांनी आपल्याकडील मुद्रांक देऊन नागरिकांची सोय करावी. विनाकारण याठिकाणी नागरिकांना त्रास देऊ नये .कणकवलीत तहसीलदार कार्यालयामध्ये बसण्याची या सर्व मुद्रांक विक्रेत्यांना व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचा गैरफायदा कुठल्याही मुद्रांक विक्रेत्यांना घेऊ नये.अशा सूचना मुद्रांक विक्रेत्यांना दिल्या.तसेच त्याचा आढावा दररोज दुय्यम निबंधक कणकवली यांनी घ्यावा ,असेही या बैठकीत त्यांनी सांगितले.

triumph-high school-ad
- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player
YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img