20.3 C
Panjim
Monday, January 24, 2022

मुख्य हंगाम गेल्याने गिलनेट मच्छिमार अडचणीत

Latest Hub Encounter

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात पारंपरिक रापण व्यावसायिकांबरोबरच पारंपरिक गिलनेट मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. हातावर पोट असलेल्या मच्छीमारांना गेल्या वर्षभरापासून मासळी मिळण्याचे प्रमाण फारच घटले आहे. परिणामी सध्या शेकडो गिलनेटधारक नौका बंदावस्थेत किनाऱ्यावर उभ्या आहेत. आता पावसाळा सुरु झाल्याने खाडीतली मासेमारी सुरु झाली आहे. मात्र मुख्य हंगाम गेल्याने हे मच्छिमार अडचणीत आहेत.

गिलनेट म्हणजे छोट्या इंजिनच्या मदतीने किनाऱ्याच्या जवळपास होणारी पारंपरिक मासेमारी. यात आऊटबोट इंजिनधारक मांड व्यावसायिक, बुडाववाले, इनबोट इंजिनधारक बल्याववाले आणि वल्हवून मासेमारी करणारे तियानीवाले यांचा समावेश होतो. यातील मांड व्यावसायिक पारंपरिक मच्छीमारांचे बांगडा मासा ही प्रमुख कॅच. मात्र, यंदाच्या हंगामात जानेवारीपासून मे अखेरपर्यंत “बांगडा मासा गेला कुठे’? असा प्रश्नं जिल्ह्यातील गिलनेटधारकांना पडला आहे. बांगड्याच्या कॅचमध्ये यावर्षी 85 टक्यां0 पेक्षा जास्त घट झाल्याचे मच्छीमारांनी सांगितले. बळा मासाही मिळणे दुर्मिळ झाले आहे. दुसरीकडे परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स मात्र कोट्यवधी रुपयांचा बळा मासा पकडून आपल्या राज्याच्या मत्स्योत्पादनात भर घालत आहेत.

परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स मत्स्य हंगामाच्या सुरुवातीलाच राज्याच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून स्थानिक मच्छीमारांच्या हक्काच्या बळा माशाची कॅच लुटून नेत असल्याचे स्पष्ट होत आहे. 15 ते 20 वावात मासेमारी करणाऱ्या छोट्या मच्छीमारांच्या जाळ्यात बळा मासा येण्यापूर्वीच हायस्पीड ट्रॉलर्सवाले तो लुटून नेत आहेत; मग स्थानिक मच्छीमारांना बळा मासा मिळणार कुठून? अशी स्थानिक मच्छीमारांची यावर्षी स्थिती झाली. गिलनेटद्वारे पापलेट मासे पकडणाऱ्या पारंपरिक मच्छीमारांच्या पदरीही निराशाच आली आहे. बल्यावांद्वारे गिलनेट प्रकारातील न्हैय मासेमारी ही प्रामुख्याने सुरमईसाठी केली जाते; परंतु बेकायदेशीर एलईडी पर्ससीन मासेमारीमुळे त्यांना सुरमई मिळणे कठीण बनले. परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सधारकांकडून लाखो रुपयांची जाळी तोडून नुकसान केले गेले आहे. दुसरीकडे काही मोजके एलईडी पर्ससीनधारक बांगडा, सुरमई, म्हाकूल, बळा, सौंदाळा वगैरे सर्वच माशांच्या साठ्यांवर डल्ला मारत असल्याने हजारो पारंपरिक मच्छीमारांवर आज बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -