मालवण तोंडवळीतही भरदिवसा बिबट्यांचे दर्शन

0
127

 

वायंगणी भंडारवाडी येथे बंद घराच्या टेरेसवर दोन दिवसांपूर्वी बिबटे दिसल्याची घटना ताजी असताना तोंडवळी येतेही बिबट्याचा संचार असल्याचे दिसून आले आहे याची माहिती काही ग्रामस्थांनी दिली.
लॉकडाऊनमुळे ग्रामस्थांचा वावर व वाहनांची वरदळ कमी झाल्याने वस्तीनजीक बिबट्यांचा संचार वाढल्याचे बोलले जात आहे
वायंगणी भंडारवाडीत भर लोकवस्तीत बिबटे दिसल्याची घटना ताजी असताना लगतच्या तोंडवळी गावात वस्तीपासून जवळ असलेल्या डोंगराळ भागात बिबट्यांचे दर्शन झाले आहे या बाबतची माहिती स्थानिक ग्रामस्थ न्यानेश गोलतकर व आदित्य पेडणेकर यांनी दिली. वायंगणी गावात दर्शन देऊन दहशत निर्माण करणारी जोडगोळी ही वायंगणी लगतच्या तोंडवळी डोंगराळ भागत फिरत असल्याचा अंदाज स्थानिकांनी वर्तवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here