अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. काही वेळापूर्वीच ही बातमी समोर आली आहे. अजित पवार यांच्या मनधरणीचे प्रयत्न गेल्या काही दिवसांपासूनच सुरु होते. आज अखेर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आता भाजपा चांगलीच अडचणीत आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते हे अजित पवारांच्या भेटीला गेले होते. त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु होते. आज ३.३० वाजता मुख्यमंत्र्यांची पत्रकारण परिषद होईल यात भाजपाची भूमिका समोर येईल.