22 C
Panjim
Sunday, January 23, 2022

भ्रमाचा भोपळा फुटला, अजित पवारांचे बंड फसले – ‘सामना’तून टीका

Latest Hub Encounter

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अजूनही कायम आहे. सर्वच पक्षांकडून बैठकांचा सपाटा सुरू आहे. अशात अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर खाल्लेले लाडू पचतील का? असा सवाल शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून विचारला आहे. अजित पवारांचे बंड फसले असून त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला असल्याचे यात म्हटले आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीसोबत बंड करत भाजपला मदत केली व त्यावरच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. अजित पवारांना तुरुगांत चक्की पिसालया पाठवू, असे सांगणारे भगतगण फडणवीस अजित पवार आगे बढो,च्या घोषणा देत होते. मात्र, त्या जल्लोषात अजित पवार कुठेच दिसत नव्हते. कारण महाराष्ट्राची जनता ‘अजित पवार मुर्दाबाद’च्या घोषणा देत आहे. भाजपने महाराष्ट्रातील सत्ता मिळवण्यासाठी तत्व, नीतिमत्ता वगैरे गुंडाळून ठेवले आहे. सत्तेसाठी कोणत्याही थराला आणि तळाला जाण्याची तयारी त्यांची आहे. पण, काहीही झाले तरी त्यांना विधानसभेत बहुमताचा आकडा गाठता येणार नाही. भाजपला आता बहुमत मिळणे म्हणजे टोणग्याने दूध देण्यासारखे आहे. अजित पवारांच्या रुपाने त्यांनी एक टोणगा गोठ्यात आणून बांधला आहे व टोणग्याचे दूध काढण्यासाठी ‘ऑपरेशन कमळ’ योजना आखली आहे. या टोणगेशाहीस मनापासून शुभेच्या देत आहेत. हातात सत्ता आहे. तपास यंत्रणा आहे. भरपूर काळ पैसा आहे. त्या जोरावर राजकारणात हवा तो उन्माद सुरू आहे.इंदिरा गांधी यांनी लादलेली आणीबाणी हा काळा दिवस वगैरे पाळण्याचे ढोंग आता भाजपवाल्यानी करू नये. राष्ट्रपती भवन, राजभवनाचा इतका गैरवापर देशात त्या काळातही झाला नव्हता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -