भरधाव कारने समोरील वाहनांना ठोकरले, चार जण जखमी

0
588

सिंधुदुर्ग – भरधाव वेगाने पुण्याकडून गोव्याकडे निघालेल्या कारने (एम.एच-१४-ईवाय-९८३४) समोरील वाहनांना ठोकरले. या तिहेरी अपघातात चार जण जखमी झाले. महामार्गावर जानवली हनुमान मंदिरासमोर हा अपघात घडला. कारने मागून ठोकरल्याने रिक्षाला पलटी झाली.

 

अपघातातील सर्व जखमींना सामाजिक कार्यकर्ते दामू सावंत व जानवली पोलीस पाटील मोहन सावंत यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

 

याबाबत माहिती अशी की, अपघातातील कार पुण्याकडून गोव्याकडे निघाली होती. ही कार महिला चालवत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

 

कार चालक महिलेचा कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. जानवली येथे याठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने आवश्यक सूचना फलक लावण्याचे आवाहन स्थानिक ग्रामस्थांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here