सिंधुदुर्ग – तेरा लाख रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतूक प्रकरणातील दारू सप्लायर (मालक )दीपेश पुंजा पटनी ( वय 31, रा. कामोठे नवी मुंबई सध्या रा. पणजी गोवा मूळ रा. गांधीनगर गुजरात) याला पोलिसांनी चातुर्याने सोमवारी रात्री कणकवलीत अटक केली. पहिल्या आरोपीसह दीपेश पटनी या दोन्ही आरोपींना येथिल न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आयशर ट्रकमधून गोवा ते मुबंई अशी गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होत असताना कणकवली पोलिसांनी 23 लाख रुपयाचा मुद्देमाल रविवारी सायंकाळी जप्त केला होता. यावेळी आयशर ट्रक चालक खलीक बग्गु खान (37) रा उत्तरप्रदेश याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांनि बारा किलोमीटरचा थरारक पाठलाग करून ही कारवाई केली होती. या कारवाई नंतर रातोरात पणजी गाठून दारू सप्लायरला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. पण आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. पहिला आरोपी खान याला जामीन देण्यासाठी हा फरार आरोपी येण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी शहरात बारकाईने नजर ठेवली होती. तसे झालेही , गोवा पासिंगची गाडी शहरात फिरताना लक्षात येताच सहाय्य्क पोलीस निरीक्षक बापू खरात आणि त्यांच्या सहकार्यांनी आरोपी दिनेश पटनी याला सोमवारी रात्री 11.15च्या सुमारास अटक केली. दोन्ही आरोपींना येथील मंगळवारी हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.