परिवहन मंत्री अनिल परब यांनी हरकूळ येथील आपल्या निवास्थानी जाणून घेतल्या एसटीचे चालक, वाहकांच्या समस्या

0
147

 

सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी आपल्या हरकुळ खुर्द येथील निवासस्थानी एसटीचे चालक व वाहक यांच्याशी बातचीत केली. तसेच प्रातिनिधीक स्वरुपात त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. फोंडा ते मोहुळ हरकुळ खुर्द ही एसटीची गाडी घेऊन चालक अजित राणे व वाहक साळवी गेले होते. गावात ही एसटी पोहोचताच मंत्री अनिल परब यांच्या कुटुंबातील काही व्यक्तींनी या चालक व वाहकांना श्री गणेशाचे दर्शन घेण्यास निवासस्थानी येण्याची विनंती केली. त्यामुळे ते दोघे तिथे गेले. यावेळी मंत्री अनिल परब यांचीही तिथे भेट झाली. यावेळी मंत्री अनिल परब यांनी या दोन्ही एसटीच्या कर्मचाऱ्यांची आस्थेने चौकशी केली. तसेच समस्या जाणून घेतल्या. त्याचप्रमाणे एसटीचे वाहक प्रवाशांना तिकीट देण्यासाठी वापरत असलेल्या मशीनचीही पाहणी केली. मंत्र्यांच्या या आपुलकीने दोन्ही कर्मचारी भारावून गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here