नितेश राणे या चुकीच्या आमदाराला आम्ही निवडून दिले, म्हणूनच करतोय आत्मक्लेश – शिवसेना नेते संदेश पारकर

0
92

 

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच एका नितेश राणेंसारख्या आमदाराला हाफ मर्डरच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. तो आमदार अप्पासाहेब पटवर्धन यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कणकवलीच्या भुमीतील आहे. आम्ही एका गुंडप्रवृत्तीच्या आमदाराला निवडुन दिलेल्या चुकीचे प्रायश्चित म्हणुन आज आपण गोपुरी आश्रम येथील आप्पासाहेब पटवर्धन स्मारकासमोर आत्मक्लेश आंदोलन करत असल्याचे शिवसेना नेते संदेश पारकर यांनी सांगितले.

गोपुरी आश्रम येथील आप्पासाहेब पटवर्धन स्मारकासमोर आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचे कालच संदेश पारकर यांनी जाहीर केले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, कणकवली वैभववाडी देवगड मतदार संघाचे दुर्दैव आहे याठिकाणी आमदार नितेश राणे यांच्या सारखा गुन्हेगारी प्रवृत्ती चा आमदार या मतदारसंघात लाभन हे दुर्दैवी आहे. ज्या पद्धतीने त्यांनी संतोष परब यांच्यावर हल्ला केला आणि हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या मतदार संघामध्ये सातत्याने गुन्हे करणे, खंडणी वसूल करणे अशाप्रकारच्या अनेक गुन्ह्यात त्यांचा सातत्याने सहभाग राहिलेला आहे. शेडेकर सारख्या अभियंत्याला काळ फासन , त्यांची धिंड काढणे. मत्स्य अधिकाऱ्यांवर मच्छी फेकणे असे अनेक गुन्हे आमदार नितेश राणे यांनी केले आहेत. अशाप्रकारचे 27 गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. असा गुंड प्रवृत्तीचा आमदारांनी निवडून दिला आहे आमचे दुर्दैव आहे. त्यांनी जिल्ह्याचा आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करावा याकरता त्यांना जनतेने निवडून दिलं होतं, मात्र ते राहिले बाजूला आणि गुंडगिरी करण्याचेच काम त्यांनी केले आहे. आणि म्हणून कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या समाधी स्थळाचे समोर आम्ही स्वतःला आत्मक्लेश करून घेत आहोत या मतदारसंघात चुकीचे आमदार निवडून आलेत, आम्ही चुकीच्या आमदाराला निवडून दिलं. याकरता आम्ही हा आत्मक्लेश करत आहोत असे संदेश वायकर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here