सिंधुदुर्ग – जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातल्या नांदगाव गावातील आठ वाडयांची असलेल्या ग्रामपंचायतीच्या जलस्वराज्य नळपाणी योजनेतून अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने तेथील नळग्राहकांनी आज ग्रा.पं.वर घागर मोर्चा काढला होता. यात बहुसंख्यसेने ग्राहक सहभागी झाले होते. यावेळी घोषणांनी नांदगाव परिसर दणानूण गेला होता .यात महीलांची उपस्थीती लक्षणीय होती.
रिकामी हांडे घागरी वाजवत काढला मोर्चा
हांडे घागरी वाजवत कोणी पाणी देता का हो पाणी अशी घोषणा देत शेकडो नळपाणी ग्राहकांचा मोर्चा ग्रा.पं.वर धडकला दोन तास चर्चा झाल्यानंतर ग्रामपंचायतच्या मागणी नुसार १० दिवसाची मुदत देण्यात आली असून जर या १० दिवसात पाणी सुरळीत न झाल्यास शुक्रवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२१ रोजी पुन्हा ग्रा.पं.घागर मोर्चा काढण्याचा इशारा लेखी स्वरूपात देण्यात आला आहे.याबाबत सरंपच व उपसरंपच यांनी मोर्चाला सामोरे जात केसीसी कंपनी मुळे आपली नळ पाईप लाईन ची कामे बाकी आहेत त्यांना सुचना देवून ही कार्यवाही होत नाही तेव्हा तुमची आम्हाला साथ हवी आहे तेव्हा त्यांना अंतिम नोटीस देण्यात यावी अशी सुचना देण्यात यावी असे सांगण्यात आले.
पोलीस बंदोबस्तात मोर्चा
नांदगाव वाशिनवाडी ,नांदगाव तिठा ,खालचीमुस्लीमवाडी ,सिसयेवाडी ,बिडयेवाडी,मोरयेवाडी ,पाटीलवाडी ,पावाचीवाडी अशा वाडयांसाठी नांदगाव ग्रा.पं.मार्फत नळपाणी योजना राबवित आहे.मात्र कित्येक दिवस पाहीले असता अनियमीत पाणी पुरवठा होत असल्याने याबाबत सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी निवेदन देण्यात आले होतें व सुरळीत न झाल्यास घागर मार्चा चा इशारा देण्यात आला होता . आज सकाळी १० वाजल्यापासून नळ ग्राहक नांदगाव ओटव फाटयावारील बॉक्सवेल ब्रीज खाली जमा होण्यास सुरूवात झाल्यानंतर ११ वा. घागर मोर्चाला सुरूवात झाली होती .नांदगाव ओटव फाटा ते नांदगाव ग्रामपंचायत पर्यंत पायी चालत घागर मोर्चाला सुरूवात झाली .कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. येत्या पाच दिवसात नळपाणी सुरळीत न केल्यास ग्रा.पं.वर घागर मोर्चा काढणार असल्याचा इशारा आज नळ ग्राहकांनी नांदगाव ग्रा.पं.ला दिला आहे.
मोर्चेकऱ्यांनी केला प्रश्नांचा भडीमा
बाकीच्या गावांनी सोमवारी सुध्दा पाणी येत आहे आणि आपल्याकडे दरदिवशी पाणी देण्यास काय हरकत आहे ? पाण्याची टाकी भरण्यास कीती तास लागतो ? आजपर्यंत टायमर कीती खरेदी केले आहे व चालू स्थीतीत कीती आहेत. नविन भिडाच्या पाईप लाईनने पाणी सुरू केव्हा होणार आहे ? 2017 पासून नांदगाव च्या नळ पाणी योजनेवर कीती खर्च झाला ? प्रत्येक माणसाला नियमाने दरदिवशी पाणी मिळणे शासनाच्या नियमाप्रमाणे अपेक्षीत असून देखीलही आपल्या बाबतीत असे का ? अशा प्रश्नाचा भडीमार यावेळी मोर्चेकऱ्यांनी केला. गेली दोन वर्ष पाण्याचा प्रश्न सुटत नाही लाखो रूपये खर्च करूनही पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकत नाही याबाबत लेखी उत्तर अपेक्षीत आहे. चर्चा झाल्यानंतर ग्रा.प.च्या मागणी नुसार १० दिवसाची मुदत देण्यात आली असून जर या १० दिवसात पाणी सुरळीत न झाल्यास शुक्रवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२१ रोजी पुन्हा ग्रा.पं.घागर मोर्चा काढण्याचा इशारा लेखी स्वरूपात देण्यात आला आहे.