23 C
Panjim
Saturday, May 21, 2022

नवचेतना महिला उद्योग समूह महाराष्ट्र कडून महिलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबीर संपन्न

spot_img
spot_img
spot_img

Latest On Hub Encounter

Latest on Passay

सिंधुदुर्ग – नवचेतना महिला उद्योग समूह महाराष्ट्र आणि कोहिनूर प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या संस्थेच्या संचालिका सिया गावडे यांच्या माध्यमातून महिलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबिर पार पडले. या शिबिरात घरबसल्या महिलांच्या हाताला रोजगार मिळण्याबाबतच्या विविध संकल्पना आणि योजना या शिबिरात मांडण्यात आल्या.

या शिबिराचे आयोजन कणकवली तालुक्यातील कुंभवडे, दारीस्ते, शिवडाव, असलदे, बावशी या गावांमध्ये करण्यात आले होते. ग्रामीण व शहरी भागातील महिला मुली विधवा बेरोजगार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देऊन शिका आणि कमवा व स्वतःच्या पायावर उभे राहा या दृष्टिकोनातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महिलांना गृह उद्योग व्यवसाय संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले तसेच विविध प्रकारचे प्रशिक्षण देखील दिले गेले ग्रामीण व शहरी भागातील महिलांच्या हाताना काम मिळावे महिलांना घरीच बसून स्वतःचा उद्योग व्यवसाय करता यावा तसेच विविध वस्तूंचे पॅकिंग करण्याचे काम मिळावे याकरता या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या शिबिरातून प्रशिक्षण घेतलेल्या महिला भगिनींना गृहउद्योगाबरोबरच विविध वस्तूंच्या पॅकिंगचे देखील काम मिळवून दिले जाणार आहे. अशी माहिती यावेळी संस्थेच्या संचालिका सिया गावडे यांनी दिली आहे.

दरम्यान महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपली संस्था कार्यरत असून ज्या महिलांना आपल्या हाताला काम मिळावे असे वाटत असेल अशा महिलांनी संस्थेकडे नोंदणी करून या संस्थेच्या माध्यमातून स्वतः देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन सिया गावडे यांच्या कडून करण्यात आले आहे. कणकवली बाजारपेठेतील पटकीदेवी मंदिराजवळ संस्थेचे कार्यालय सुरू झाले असून महिला भगिनींनी अधिक माहिती करता 9422863790 या क्रमांकावर अवश्य संपर्क साधावा असे देखील त्या यावेळी म्हणाल्या आहेत.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img