गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात अतिरिक्त विशेष ट्रेन, रेल्वे विभागाचा निर्णय

0
87

सिंधुदुर्ग – गणेशोत्सवाकरिता कोकणात येणाऱ्या प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीचे विभाजन करण्यासाठी मध्य रेल्वे कडून 40 फेऱ्यांच्या अतिरिक्त विशेष ट्रेन चालविण्यात येणार आहेत.

असे असणार आहे नियोजन

1. मुंबई- सावंतवाडी रोड विशेष (२ फे-या)

01235 विशेष दि. ७.९.२०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १३.१० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी ०२.०० वाजता पोहोचेल.

01236 विशेष दि.१०.९.२०२१ रोजी सावंतवाडी रोड येथून ०२.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे त्याच दिवशी १४.०० वाजता पोहोचेल.

२. पनवेल- सावंतवाडी रोड विशेष (४ फेऱ्या)

01237 विशेष दि. ८.९.२०२१ आणि ९.९.२०२१ रोजी पनवेल येथून १४.१० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी ०२.०० वाजता पोहोचेल.

01238 विशेष दि. ८.९.२०२१ आणि ९.९.२०२१ रोजी सावंतवाडी रोड येथून ०२.३० वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी १२.०० वाजता पोहोचेल.

3. लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव विशेष (६ फेऱ्या)

01239 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ५.९.२०२१, ७.९.२०२१ व ९.९.२०२१ रोजी ०५.३३ वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी २०.०० वाजता पोहोचेल.

01240 विशेष मडगाव येथून दि. ५.९.२०२१, ७.९.२०२१ व ९.९.२०२१ रोजी २०.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १०.३० वाजता पोहोचेल.

4. लोकमान्य टिळक टर्मिनस- कुडाळ विशेष (६ फेऱ्या)

01241 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ३.९.२०२१, ७.९.२०२१ व १०.९.२०२१ रोजी ००.४५ वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी ११.२० वाजता पोहोचेल.

01242 विशेष कुडाळ येथून दि. ५.९.२०२१, ८.९.२०२१ व १२.९.२०२१ रोजी १२.१० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी २३.५५ वाजता पोहोचेल.

५. पनवेल-कुडाळ विशेष (६ फेऱ्या)

01243 विशेष पनवेल येथून दि. ४.९.२०२१, ८.९.२०२१ व ११.९.२०२१ रोजी ००.१५ वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी ११.२० वाजता पोहोचेल.

01244 विशेष कुडाळ येथून दि. ३.९.२०२१, ७.९.२०२१ व १०.९.२०२१ रोजी १२.१० वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी २३.१० वाजता पोहोचेल.

6. पनवेल- कुडाळ विशेष (४ फेऱ्या)

01245 विशेष पनवेल येथून दि. ५.९.२०२१ आणि १२.९.२०२१ रोजी ००.१५ वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी ११.२० वाजता पोहोचेल.

01246 विशेष कुडाळ येथून दि. ४.९.२०२१ आणि ११.९.२०२१ रोजी १२.१० वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी २३.०० वाजता पोहोचेल.

7. पुणे- मडगाव/करमळी- पुणे विशेष (२ फेऱ्या)

01247 विशेष दि.८.९.२०२१ रोजी पुणे येथून १८.४५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी १०.०० वाजता पोहोचेल.

01248 विशेष करमळी येथून दि. १०.९.२०२१ रोजी १५.१० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५.५० वाजता पोहोचेल.

8. पनवेल – करमळी/मडगाव- पनवेल विशेष (२ फेऱ्या)

01249 विशेष पनवेल येथून दि.१०.९.२०२१ रोजी ००.१५ वाजता सुटेल आणि करमळी येथे त्याच दिवशी १४.१५ वाजता पोहोचेल.

01250 विशेष मडगाव येथून दि. ९.९.२०२१ रोजी ११.३० वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी २३.०० वाजता पोहोचेल.

आधी घोषित केलेल्या श्रीगणेश उत्सव विशेष ट्रेनच्या अतिरिक्त फेऱ्या

वर नमूद विशेष ट्रेन व्यतिरिक्त, आधीच जाहीर केलेल्या विशेष ट्रेनच्या अतिरिक्त फेऱ्या (८) खालील प्रमाणे चालविण्यात येतील:

01227 मुंबई- सावंतवाडी रोड विशेष दि. ४.९.२०२१ रोजी.

01228 सावंतवाडी रोड-मुंबई विशेष दि. ४.९.२०२१ रोजी.

01229 मुंबई- रत्नागिरी विशेष दि. ३.९.२०२१ रोजी.

01230 रत्नागिरी- मुंबई विशेष दि.५.९.२०२१ रोजी.

01234 रत्नागिरी- पनवेल विशेष दि. ३.९.२०२१ रोजी.

01231 पनवेल- सावंतवाडी रोड विशेष दि. ४.९.२०२१ रोजी.

01232 सावंतवाडी रोड -पनवेल विशेष दि. ४.९.२०२१ रोजी.

01233 पनवेल- रत्नागिरी विशेष दि. ५.९.२०२१ रोजी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here