कशेडी घाटात अपघातांचे सत्र सुरूच एसटी बसचा मोठा अपघात, आठ प्रवासी जखमी

0
2320

 

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड हद्दी मधील कशेडी घाटात टँकरची एसटी बसला धडक बसून झालेल्या मोठ्या अपघातात आठ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची खबर मिळताच मदत ग्रुप खेड चे प्रसाद गांधी आपली रुग्णवाहिका घेऊन पेशंट ला कळंबणी हॉस्पिटल आणि त्या नंतर डेरवण येते पेशंट घेऊन गेले. गेले काही दिवस या महामार्गावर कशेडी परिसरात अपघातांचं सत्र सुरू आहे त्यामुळे वाहन चालकांनी या वाहन चालवताना काळजी घेणे अत्यावश्यक झाले आहे.

८ प्रवासी जखमी प्रवासींना कळंबणी उपजिल्हा रुग्णालय उपचार साठी दाखल करण्यात आले आहे.
सोमवारी सकाळी 11.50 सुमारास हा मोठा अपघात झाला आहे. कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्रापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर कशेडी घाटात ठाणे ते चिपळूण जाणारी एसटी बसक्र. MH-14-BT-2635
वरील चालक योगेश दादाजी देवरे वय 35वर्षे हे कशेडी घाट उतरत असताना समोरून वाकवली तालुका दापोली ते मुंबई जाणारा टँकर क्रमांक UP-70-HT-7551 वरील चालक दिनानाथ हिरालाल यादव वय 55 वर्षे राहणार घाटकोपर मुंबई यांचे डोळ्यावर झापड आल्याने त्याने रॉंग साईडला जाऊन समोरून येणारे एसटी बसला धडक दिल्याने अपघात झाला आहे.सहाय्यक फौजदार यशवंत बोडकर व पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत महामार्गावरील वाहतूक सुरळीत करत अपघात ग्रस्तांना मदत केली.

अपघातामधील एसटी बस मध्ये एकूण 25 प्रवासी होते. त्यापैकी 8 प्रवाशांना किरकोळ दुखापत झालेले आहे.
या अपघातातील जखमींमध्ये अनंत दत्तात्रय विंचू वय 65 वर्षे राहणार चिपळूण यांचे उजवे दाढेला व उजव्या पायाला दुखापत झाली आहे. सुरेश शंकर सोलकर वय 60 वर्षे राहणार कामथे चिपळूण, श्याम बापू पावरी वय 65 वर्षे राहणार कुडली तालुका गुहागर, सौ इरावती श्याम पावरी वय 55 वर्षे राहणार कुडली तालुका गुहागर, सौ. वनिता गणपत रेणोसे वय 70 वर्षे राहणार वाळूंज तालुका महाड,
गणपत पांडुरंग रेणोसे वय 75 वर्षे राहणार वाळू़ंज तालुका महाड, शुभांगी सुभाष येरूळकर वय 65 वर्ष राहणार बिजगर खेड, बाळकृष्ण महादेव कदम वय 75 वर्ष राहणार वडघर तालुका पोलादपूर यांना किरकोळ दुखापत झाली असून मुका मार लागला आहे.
या जखमींपैकी अनंत दत्तात्रेय विंचू यांना जास्त प्रमाणात दुखापत झाल्याने खेड कळंबणी उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघाताची नोंद खेड पोलीस ठाण्यात करण्याची कार्यवाही संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here