‘शिवस्वराज्य दिना निमित्ताने देवगड- गवाणे येथील चित्रकार अक्षय मेस्त्री याने कवड्यावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे चित्र रेखाटले आहे
हे चित्र त्याने अवघ्या पाच मिनिटाच्या कालावधीत ॲक्रेलिक रंगांचा वापर करून रेखाटले आहे
यापूर्वी ही अक्षय याने इवल्याशा तिळावर देखील छत्रपती शिवाजीमहाराजांचे चित्र रेखाटले आहे
आणि आज शिवस्वराज्य दिना निमित्ताने कवड्यावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे चित्र रेखाटून अक्षयने शिवाजीमहाराजांना अनोखी मानवंदना दिली आहे.