28 C
Panjim
Wednesday, May 18, 2022

कणकवली तालुक्यातील नरडवे मार्गांवरील मल्लरी पूल कोसळला

spot_img
spot_img
spot_img

Latest On Hub Encounter

Latest on Passay

सिंधुदुर्ग – कणकवली – कनेडी – नरडवे मार्गावरील अगोदरच मोडकळीस आलेला मल्हारी पूल पुराच्या तडाख्याने कोसळला आहे. यामुळे नाटळ, नरडवे, दारिस्ते, दिगवळे, तसेच कनेडी परिसरातून घोटगे, जांभवडे, कुपवडे, सोनवडे गावात जाणारी वाहतूक खंडित झाली.

गुरुवारी सकाळी झालेल्या विक्रमी मुसळधार वृष्टीमुळे कनेडी – कणकवली मार्गांवर ठिकठिकाणी पुराचे पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. या मार्गांवरील सखल पुलांची उंची वाढविल्यावर गेल्या सोळा वर्षात पुराच्या पाण्यामुळे वाहतूक बंद होण्याचा प्रकार पहिल्यांदा घडला.

सकाळी 7 वाजल्यापासून 4 तास ‘ रेकॉर्ड ब्रेक ‘संततधार मुसळधार वृष्टी झाली. यामुळे कधी नाही एवढा नद्याना पूर आला कनेडी कणकवली मार्गांवरील सांगवे येथील श्री देव रामेश्वर मंदिराला गडनदिच्या पुराच्या पाण्याने वेढा घातला.

मंदिराजवळच्या रस्यावर, सांगवे येथील खडशी नदीच्या पुलाजवळच्या मोरिवर, डिगवेकर ऑइल मील जवळ पाणी आल्याने वाहतूक खंडित झाली.

मल्हारी पुलाच्या नाटळ बाजूच्या दिशेकडील तिसऱ्या पिलर खालील बाजूने ढासळत चालल्याचे महिन्यापूरवीं निदर्शनास आल्यावर तात्पुरती डागडुजी करून अवजड वाहनाना बंदी घालण्यात आली होती आज आलेल्या पुराच्या पाण्यामुळे त्या पिलर वरील भाग कोसळला आहे.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img