कणकवलीत जिल्हा बँकेसाठी ४२ मतदारांनी बजवला मतदानाचा हक्क महाविकास आघाडी, भाजपा बुथवर कार्यकर्त्यांनी केली गर्दी;पोलिसांचा चोख बंदोबस्त..

0
61

 

सिंधुदुर्ग – मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली तहसीलदार कार्यालयाबाहेर महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते एका बुथवर तर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते दुसऱ्या बुथवर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

कणकवलीत १६५ मतदार असल्याने त्या मतदारांना मतदान केंद्रांमध्ये आणण्यासाठी करण्यासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. आतापर्यंत कणकवली ४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.राजकीय दृष्ट्या संवेदनशील कणकवलीत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

कणकवलीतील मतदान केंद्रावर भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनलचे प्रमुख भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी मतदान केले आहे. तर महा विकास आघाडी पुरस्कृत समृद्धी पॅनलचे प्रमुख जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, आमदार वैभव नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here