29 C
Panjim
Wednesday, May 18, 2022

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचे महिला पोलिसांकडून सारथ्य महिला पोलीस तृप्ती मुळीक यांनी केले सारथ्य

spot_img
spot_img
spot_img

Latest On Hub Encounter

Latest on Passay

 

सिंधुदुर्ग – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी त्यांच्या गाडीचे सारथ्य तृप्ती मुळीक या सिंधुदुर्ग पोलिस दलातील महिला चालकाने केल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महिला पोलीस तृप्ती मुळीक यांनी केले सारथ्य

आज ओरस येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्तितीत पार पडली. ते विमानतळावरून कार्यक्रमस्थळी आले तेव्हा त्यांच्या गाडीचे सारथ्य एका महिला पोलीसाने केले. त्यामुळे तृप्ती मुळीक या महिला पोलीस भगिनींचे सर्वत्र कौतुक होत आहे.राज्यात मंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य एका महिलेने केले ही पहिलीच घटना असावी.राज्य शासन नेहमीच महिलांच्या सक्षमीकरनावर भर देत आहे त्याची ही पावतीच म्हणावी लागेल.

उपमुख्यमंत्र्यांसोबत उदय सामंत, सतेज पाटीलही होते गाडीत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी त्यांच्या गाडीचे सारथ्य तृप्ती मुळीक या पोलिस दलातील महिला चालकाने केले. महिलांच्या कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त करून त्यांच्या सक्षमीकरणाचा लोकनेते शरद पवार यांचा वारसा उपमुख्यमंत्री अजित पवार हे समर्थपणे पुढे नेत असल्याचे यातून दिसून येते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनाचे सारथ्य करणाऱ्या भगिनीला सलाम. या गाडीत पालकमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री सतेज पाटील हे देखील होते.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img