आर्सेनिक अल्बम 30’ वितरीत करणारा ‘सिंधुदुर्ग’ एकमेव – आमदार नितेश राणे

0
149

 

सिंधुदुर्ग – कोरोनाच्या संकटात लढण्यासाठी येथील जनतेला सुरक्षा कवच देण्याचा आपला प्रयत्न आहे. कोरोना व्हायरसबरोबरच पावसाळय़ात साथीचे आजार डोकं वर काढण्याची शक्मयता आहे. या सर्व आजाराविरोधात लढताना प्रत्येकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, यासाठी आर्सेनिक अल्बम-30 या गोळय़ा उपयुक्त आहेत. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी केरळसारख्या राज्यात या गोळय़ा फायदेशीर ठरल्या आहेत. त्याचे चांगले परिणाम जाणवले आहेत. आर्सेनिक अल्बम-30 गोळय़ा वितरीत करणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील एकमेव जिल्हा असल्याचे आमदार नीतेश राणे यांनी येथे स्पष्ट केले.

कोरोनाच्या संकटात लढण्यासाठी आर्सेनिक अल्बम-30 हे एक भक्कम सुरक्षा कवच आहे. म्हणून प्रत्येक नागरिकापर्यंत गोळय़ांचा डोस पोहोचविणार आहोत. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ मंडळींच्या सल्ल्यानुसार गोळय़ांचे वाटप सुरू आहे. डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार या गोळय़ांचा डोस सेवन करा व आपली रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत करा, असे आवाहन राणे यांनी केले.

गोळय़ांचे वाटप करताना आम्ही कोणताही दुजाभाव करणार नाही. याप्रसंगी कोणावरही टीका-टिपणी करणार नाही. सर्वांना गोळय़ा घरपोच होणार आहेत. त्याबाबत कोणीही काळजी करू नये. गोळय़ा घरपोच झाल्यानंतर आमची वैद्यकीय टीम संबंधित कुटुंब मालकाचे नाव, सही व मोबाईल नंबर घेणार आहेत. पुढील डोस देताना डॉक्टरांकडे त्या गावातील नागरिकांची माहिती असावी, यासाठी त्यांची नोंदणी केली जाणार असल्याचे राणे यांनी सांगितले.

कोरोना संकटात प्रत्येक गावचा सरपंच भरडला जात आहे. राज्य शासनाच्या नियोजनशून्य कारभाराचे खापर सरपंचांवर फोडले जात आहे. सरपंचांवर होणाऱया अन्यायाविरोधात सर्व सरपंचांनी एकत्रित येऊन राज्य शासनाच्या विरोधात भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईतून येणाऱया चाकरमान्यांची अगोदर यादी सरपंचांकडे आली असती, तर योग्य नियोजन करणे त्यांना शक्मय झाले असते. क्वारंटाईनची जबाबदारी सरपंचांवर, पण त्यांना कोणताही निधी नाही. त्यांना कोणतेही संरक्षण नाही. मात्र सरपंचांकडे डोंगराएवढय़ा अपेक्षा शासन ठेवत असल्याचा आरोप त्यांनी केला.

सरकारच्या धोरणाविरोधात भूमिका सरपंचांनी आता घेतलीच पाहिजे. सरपंच जर गप्प राहणार असतील, तर भविष्यात सरपंचांच्या घरावर मोर्चे येणार हे निश्चित आहे. ई-पासचे कोणतेही नियोजन शासनाकडे नाही. मात्र जिह्याच्या सीमेवर आलेल्या चाकरमान्यांना परत हुसकावून लावण्याचे नियोजन यांच्याकडे आहे. हे आम्ही कदापिही सहन करणार नाही. सीमेवर आलेल्या चाकरमान्यांना आपल्या घरी सोडलेच पाहिजे, असे राणे यांनी सुनावले.

या संकटात सरपंचांना ताकद देणे ही आमची जबाबदारी आहे. मी सगळी ताकद उभी करीन. मात्र अन्यायविरोधात आता भूमिका घेणे गरजेचे असल्याचे राणे यांनी सांगितले. यावेळी भालचंद्र साठे, डॉ. गोखले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच, भाजप पदाधिकारी, गाव अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here