सुदिन ढवळीकरानी आमदारकीच्या राजीनाम्याचे आव्हान स्वीकारावे, आर.जी. पक्ष मडकईत उलथापालट करून दाखवेल: विरेश बोरकर

0
123

रेव्होलुशनरी गोवन्स सध्या राज्यभर लोकांचे विषय, लोकांच्या समस्या गंभीरतेने मांडताना दिसत आहे. फोंडा मतदारसंघात सुद्धा आर.जी. सक्रिय असून, जनतेचे विविध विषयावर आवाज करुन सरकारला जाब विचारून, सरकारमधील अकार्यक्षम आमदारांची पोलखोल करण्याचे काम आर.जी. करत आहे. दोन दिवसांपूर्वी मगो चे मडकई मतदारसंघातील आमदार सुदिन ढवळीकर यांनी पत्रकार परिषद घेवून आर.जी. पक्षाला टार्गेट करताना म्हटले होते की, आपल्या मतदारसंघाबरोबर, फोंडा तालुक्यातील इतर मतदारसंघातील लोक सरकारविरुद्ध आवाज उठवत नाही तर फक्त आर.जी. पक्षच लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहे, त्यांनी यावेळी आर.जी. पक्षाला आव्हान सुद्धा दिले की, यापुढील निवडणुकीत आर.जी.पक्षाला दीड हजार सुद्धा मते ते घ्यायला देणार नाही. याचेच प्रत्युत्तर देण्यासाठी काल सांत आंद्रेतील आमदार विरेश बोरकर यांनी पत्रकार परिषद बोलाविली होती.

यावेळी बोलताना आमदार विरेश बोरकर यांनी सुदिन ढवळीकर यांचे आव्हान स्विकारले असून, ढवळीकर यांनी आता स्वतः राजीनामा द्यावा आम्ही जास्तीत जास्त मते त्यांच्या मतदारसंघात मिळवून दाखवू असे प्रती आव्हान सुद्धा बोरकर यांनी ढवळीकर यावेळी प्रसार माध्यमातून दिले.

ढवळीकर बंधू हे सतत जनतेला वेड्यात काडत आलेले आहेत. बहुजन समाज बहुजन समाज असे बोलून जनतेला त्यांनी लाचार बनवण्याचे काम ते करत आलेले आहे. आता आर.जी. पक्ष उघड उघड अशा ब्रश्टाचारी, अकार्यक्षम मंत्र्याचा पर्दापाश करत असल्याने, त्यांच्या पायाखालची जमीन हालाताना दिसत आहे, त्यामुळेच ते आर.जी. पक्षावर आरोप करत असल्याचे बोरकर म्हणाले.

आर जी. पक्षाने मडकई मतदारसंघात होणाऱ्या अन्यायावर, जसे की उंडीर गावातील मलनिस्सारण प्रकल्प ज्याला स्थानिक लोकांचा विरोध आहे, तसेच बांदोडा येथील बेकायदेशीर शापूर बस्तीवर आवाज उठविला आहे. आज ढवळीकर बंधू हे परप्रांतीयांचे राखणदार झालेले आहेत. आपल्या राजकीय स्वार्थासाठी ते गोवेकरावर अन्याय करत आहेत. गोवेकरांच्या बाजूने ते नसून परप्रांतीयांसाठीच ते काम करत असल्याचे वेळोवेळी सिद्ध झालेले आहेत. ढवळीकर यांना स्वताला फोंडा तालुक्यातील महाराज असल्याप्रमाणे सत्तेचा माज चडलेला असून आर.जी. पक्षच म गो पश व ह्या ढवळीकर बंधूंचा राजकीय करिअर कायमचे उध्वस्त करणार असल्याचेही बोरकर म्हणाले.

सांत आंद्रे मतदारसंघात मगो पक्ष काम करणार असल्याच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना विरेश बोरकर यांनी म्हटले की, आदी आपल्या मडकई मतदारसंघात लोकहिताची कामे करा, मतदारसंघाचा विकास करा, त्यानंतरच आपल्या मतदारसंघात या. सांत आंद्रेत ढवळीकर यांनी मुख्यमंत्री तसेच इतर कार्यकर्त्यांना घेवून खोट्या आश्वासनांची खैरात वाटायला जरी आले तरी येथील जनता अशा भूलथापांना बळी पडणार नाही. आज डबल इंजिन सरकार लोकहितासाठी काम करताना दिसत नाही. खांडेपार बंधारा प्रकल्प, तसेच भोमवासियाना सुद्धा महामार्ग रस्ता विषयावर विश्वासात ह्या हुकूमशाही सरकारला घेता आले नाही. आर.जी पक्ष हाच गोव्यातील लोकांचा विश्वास आहे हे सिद्ध होत असल्यामुळे ढवळीकर बंधू सहित इतर नेते मंडळी भयभीत स्थितीत.असल्याचेही विरेश बोरकर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here