सिंधुदुर्गात 70 वर्षीय कोरोना बाधीत वृद्धाचा मृत्यू जिल्ह्यात एकूण मृतांचा आकडा चार वर.

0
172

 

सिंधुदुर्ग – सावंतवाडी येथील 70 वर्षीय कोरोनाबाधीत वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मृत्यू झालेल्या कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 अशी झाली आहे.

हा वृद्ध रुग्ण 10 जून 2020 रोजी मुंबई येथून आला होता. त्याला मधुमेह, उच्चरक्तदाब, श्वसनदाह असे आजार होते अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
जिल्ह्यात आज आणखी 10 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 94 झाली आहे. तर जिल्ह्यात आज पर्यंत 55 सक्रीय रुग्ण आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत आलेले एकूण 2,976 नमुने तपासणीला पाठविण्यात आले त्यातील 2, 901 अहवाल प्राप्त झालेले नमुने आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉजिटीव्ह आलेले नमुने 154 असून, निगेटीव्ह आलेले नमुने 2,747 आहेत. तर अहवाल प्राप्त न झालेले नमुने 75
आहेत. जिल्ह्यात सध्या संस्थात्मक अलगीकरणात 17,927 व्यक्ती आहेत. शासकीय संस्थांमधील अलगीकरणात 146 व्यक्ती आहेत.
तर गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणात 15,968 व्यक्ती आहेत. नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणात 1,813 व्यक्ती आहेत. तर 2 मे 2020 रोजीपासून आतापर्यंत जिल्ह्यात 96,172 व्यक्ती दाखल झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here