सिंधुदुर्गात शासकीय मेडिकल कॉलेजला ठाकरे सरकारने दिली परवानगी… कणकवली शिवसेनेच्यावतीने फटाक्यांच्या आतषबाजी; जोरदार घोषणाबाजी…

0
323

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या शासकीय मेडिकल कॉलेज परवानगीसाठी खा.विनायक राऊत,पालकमंत्री उदय सामंत, आ.वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेडिकल कॉलेजला परवानगी दिली आहे. त्यामुळे कणकवलीत शिवसेनेच्यावतीने पेढे वाटत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेना झिंदाबाद ,बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो ,राऊत साहेब आगे बढो..हम तुम्हारे साथ हैं..अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या.

कणकवली पटवर्धन चौक येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये,नगरसेवक सुशांत नाईक,युवा सेना समन्वयक राजू राठोड,शहरप्रमुख शेखर राणे,दामू सावंत,रिमेश चव्हाण,विलास गुडेकर,सचिन पोळ,श्री.वळंजू,विलास राठोड,सतू गुडेकर,नितीन अंकुश राव,अविराज खांडेकर,पराग पवार,सचिन राठोड आदी शिवसैनिक उपस्थित होते.
सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयोजित करुन पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना नेत्यांनी मागणी केली होती . त्यानंतर यावर तातडीने कार्यवाहीचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले . होते त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव व वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या सचिवांची आढावा बैठक घेण्यात आली होती . वैद्यकीय महाविद्यालय होण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी अखेर आज शिक्कामोर्तब केला आहे.

सुशांत नाईक म्हणाले, शासकीय मेडिकल कॉलेज व्हावे अशी तमाम सिंधुदुर्गवसियाची मागणी होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी देवून जिल्हावासियाचे स्वप्न सत्यात उतरवले आहे.याबद्दल खास विनायक राऊत,पालकमंत्री उदय सामंत,आम.दीपक केसरकर ,आम वैभव नाईक यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.त्या बद्दल शिवसेना पक्षाच्यावतीने अभिनंदन करत हा जल्लोष केल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here