27 C
Panjim
Thursday, August 11, 2022

सिंधुदुर्गात रेशन धान्याचा काळाबाजार, दोघांवर गुन्हा दाखल स्थानिक ग्रामस्थांनी धान्याची वाहतूक करणारा टेम्पो दिला होता पकडून

spot_img
spot_img

 

सिंधुदुर्ग – कणकवली तालुक्यातील सांगवे येथील रास्त भाव धान्य दुकानाच्या तपासणीत धान्यामध्ये तफावत आढळून आल्याने पुरवठा निरीक्षक नितीन शंकरदास डाके यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून दोन जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यातील सुमित देवानंद मयेकर (वय ३८) याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

सांगवे येथे धान्य पिकअप टेम्पोतून काळ्याबाजारात नेण्यासाठी अन्यत्र हलविण्यात येत असतांना मंगळवारी काही ग्रामस्थांनी संशयितांना पकडले होते. त्यानंतर तातडीने महसूल पुरवठा विभागाला कळविण्यात आले. त्यावेळी पुरवठा अधिकारी नितीन डाके, मंडळ अधिकारी डी. एम. पाटील आदींनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर चौकशी करून रास्त दराच्या धान्य दुकानाची तपासणी करण्यात आली. तपासणी मध्ये अनियमितता आढळून आली. त्यामुळे डाके यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ८ डिसेंबर २०२० रोजी सेल्समन सुनील हरी तोरस्कर याच्या ताब्यातील रास्तभाव धान्य दुकान सांगवे मधील तपासणीमध्ये अंदाजे किंमत रुपये ५१,६४४ किमतीच्या धान्यामध्ये तफावत असल्याचे दिसुन आले. तसेच वाहन क्रमांक एम. एच. ०७-ए. जे.१६४६ मध्ये धान्य आढळून आले. वाहनचालक सुमित देवानंद मयेकर (रा. जामसंडे, देवगड ) यांनी जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा केला आहे. दरम्यान, पोलिसांनी ८२००० रुपयाची २४.८५ क्विंटल तांदुळ असलेली ५१ पोती मुद्देमालासह पंचनामा करून ताब्यात घेतली आहेत. तसेच बोलेरो पिकअप तसेच वाहन चालक सुमित देवानंद मयेकर व सेल्समन सुनील हरी तोरस्कर यांच्याविरोधात तक्रार दाखल झाल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

स्थानिकांनी पकडला होता टेम्पो

मंगळवारी सांगावे येथील रेशन धान्य दुकानात धान्य भरून घेऊन जाताना एम. एच. ०७-ए. जे.१६४६ या क्रमांकाचा देवगड येथील पिकअप टेम्पो स्थानिक ग्रामस्थांनी पकडून महसूल आणि पोलीस विभागाच्या ताब्यात दिला होता. या टेम्पोत रेशनचे धान्य असल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर कणकवली तहसीलदार कार्यालयाच्या पुरवठा शाखेच्या अधिकाऱ्यांनी या मालाची तपासणी केली तसेच रेशन धान्य दुकानातील मालाचीही तपासणी केली असता मालात तफावत असल्याचे समोर आले होते.

triumph-high school-ad
- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player
YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img