सिंधुदुर्ग – दूरदर्शनचे जिल्हा प्रतिनिधी विजय गावकर यांनी दारिस्ते येथील स्वप्नाली सुतार हिच्या खडतर शैक्षणिक वाटचालीबाबत केलेली न्यूज स्टोरी सर्वोत्कृष्ट ठरली आहे. त्याबद्दल श्री.गावकर यांना कॅश अॅवॉर्ड आणि प्रशस्तीपत्राने गौरविण्यात येणार आहे.
दारिस्ते गावातील स्वप्नाली सुतार हिला ऑनलाइन अभ्यासाचे धडे घेण्यासाठी घरापासून दोन किलोमिटर जंगलात जावे लागत होते. तेथे इंटरनेटची रेंज मिळवून ऊन पावसात तिचा अभ्यास सुरू होता. स्वप्नालीची ही धडपड दूरदर्शनचे जिल्हा प्रतिनिधी विजय गावकर यांनी आपल्या न्यूज स्टोरीमधून मांडली होती. त्याची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली आणि स्वप्नाली हिला घरापर्यंत इंटरनेटची रेंज मिळवून दिली. विजय गावकर यांनी केलेली ही न्यूज स्टोरी दूरदर्शनच्या ‘बेस्ट स्टोरी’ मध्ये निवडण्यात आली. यानिमित्ताने त्यांना कॅश अवॉर्ड आणि प्रशस्तिपत्र याने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच गावकर यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.